आज काल प्रत्येकाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालू आहे , आणि वेळ आहे ९ ते ५ !!! बरोबर ना ?
मग सकाळी उठल्यापासून ते झोपे पर्यंतच्या सगळ्या आवश्यक गोष्टी आपण या वेळेनुसार
" Manage / मैनेज " करतोय , बरं ते करता करता मात्र - स्वास्थय, तब्येतीच्या तक्रारी ,आजारपण, वाढतंय आणि व्यायाम करण्याची इच्छा, आणि इच्छा असेल तर तो करण्यासाठीचा वेळ हा कमी होत चाललाय .
या जागतिक योग दीना ( २१ जुन ) निमित्त हा नवा विडिओ - कि कसा आपल्या या व्यस्थ घडाळ्यात , दिवसातील फक्त १५ मिनटात देऊन , तो संपूर्ण ९ ते ५ चा थकवा आणि शीण कसा घालवता येईल - ते ही योगाच्या माध्यमातूम हे बघुयात !
खरं तर मी मनापासून असं म्हणेन कि हे सोप्पे , अगदी आपल्या ऑफिस च्या खुडचीवर बसून होणारे योग प्रकार / स्ट्रेचिंग चे प्रकार करण्याचा फक्त प्रयत्न नाही तर याला रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा - कारण आपलं शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या करिअर प्रमाणे प्रगती करणारे हवे , नाहीतर कुठलही यश अपूर्ण आहे !
" दिवसातून एकदा जरी केला योग,
तर तुमच्या जवळ कधी येणार नाही कुठलाही रोग "
तुमच्या आपल्या डॉक्टरांचा आग्रही आणि प्रेमळ सल्ला
- डॉ बिपीन विभुते
#internatinalyogaday #worldyogaday #yogaday2023 #yogapostermaking #june21 #yogaposter #yogdiwas #yogadayposter #yogadayreels #drbipinvibhute #livercare #surgeonnline #yogadayimages #kundaliniyoga #streching #officeyoga #yogaonchair #corporateyoga #9t05job #yoga #yogateacher
Негізгі бет 10-minute yoga routine to relax in the office chair
No video
Пікірлер: 6