|| श्री स्वामी समर्थ ||
|| Shree Swami Samarth||
तारक मंत्र | Tarak Mantra
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||१||
जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय,
आज्ञेविना काळ ना नेई त्याला,
परलोकीही ना भिती तयाला ||२||
उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ||३||
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त,
आठव कितीदा दिला त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ ||४||
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ,
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||५||
Powerful Shree Swami Samarth Tarak Mantra for Divine Protection and Spiritual Awakening
#ShreeSwamiSamarth #TarakMantra #श्रीस्वामीसमर्थ #तारकमंत्र #DivineProtection #SpiritualAwakening #Meditation #ChantingPractice #InnerPeace #CosmicEnergy #दैवीसंरक्षण #आध्यात्मिकजागृत #जप #आंतरिकशांती #वैश्विकऊर्जा
Негізгі бет ११ वेळा तारक मंत्र | 11 times Tarak Mantra | || श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarth ||
Пікірлер: 270