व्हिडियो बघत बघत पेटी वाजवून भजन गायला शिका
गा बाळांनो, श्रीरामायण with notation
Master the Art: Learning the Notation of Raag Bhairavi in Simple Steps
गा बाळांनो, श्रीरामायण काळी चार पट्टीत सुगम नोटेशन गुरुवर्य श्री. नामदेव महाराज पठाडे याना समर्पित
रघुराजाच्या नगरी जाउन गा बाळांनो, श्रीरामायण ॥धृ॥
मुनिजन-पूनित सदनांमधुनी नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गातुन, राजपथातुनि मुक्त दरवळो, तुमचे गायन ॥१॥
रसाळ मूळे, फळे सेवुनी रसाळता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरा मिळवुनी लय-तालांचे पाळा बंधन ॥२॥
नगरी लाभता लोकमान्यता जाइल वार्ता श्रीरघुनाथा
उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हा निमंत्रण ॥३॥
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटु द्या स्पष्ट गायनी
थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण ॥४॥
नका सांगु रे नाम ग्राम वा स्वत:स माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण ॥५॥
स्वये ऐकता नृप शत्रुंजय, संयत असु द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे हा अमृतसंचय, आदरील त्या रघुकुलभूषण ॥६॥
नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां? अवघ्या आशा श्रीरामार्पण ॥७॥
व्हिडियो बघत बघत पेटी वाजवून भजन गायला शिका
अनेकदा भजन कीर्तन भक्तीसंगीत ऐकल्यावर बहुतेकांना त्यातले संगीत समजावून घ्यावेसे वाटते, स्वतःला गाता वाजवता यावं अशी इच्छा होते. पण काही ना काही स्थावर जंगम अडथळे येतात. कधी गुरु भेटत नाही तर कधी गुरूला द्यायला जवळ दक्षिणा नसते, कधी वेळ भेटत नाही तर कधी समान अभिरुची असणारे जवळ कोणी नसते.
एनकेन कारणांनी शिकायचे राहून जाते. अशा हौशी लोकांना घरबसल्या आपला छंद जोपासता यावा यासाठी या च्यानेलवर भजनाचे ONSCREEN NOTATION उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण व्हिडीओ पहा, आवडल्यास कमेंट करा, लाईक, शेअर व सबस्क्राइब करा.
मो. : ८१०८६६६८१० Before call whatsp plz
Негізгі бет ३२) रघुराजाच्या नगरी जाउन गा बाळांनो श्रीरामायण मो.८१०८६६६८१०
Пікірлер: 8