घरच्या घरी अशी इडली करून बघा. त्याबरोबर लाल टोमॅटोची चटणी फारच छान लागते. लाल चटणी आणि इडली हा उत्तम नाष्टा आहे. इडली अतिशय मऊ आणि लुसलुशीत होते. उडिद डाळीमुळे इडली पौष्टिक होते. इडली पचायला हलकी आहे. इडली अगदी पोटभर अन्न आहे. इडलीचं पीठ दोन दिवस टिकतं पण. इडलीच्याऐवजी त्याच पिठाचे डोसे करता येतात.
इडली अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. इडलीबरोबर सांबारही छानच लागते.
Music from Appuseries.com
साहित्य --
इडलीसाठी -
1) 3 वाट्या साधा तांदूळ (420 ग्रॅम)
2) 1 वाटी उडदाची डाळ (140 ग्रॅम)
3) 1 टीस्पून मेथीदाणे
4) 1/2 वाटी पोहे
5) मीठ
लाल चटणीसाठी -
1) 2 टीस्पून तेल
2) 4 लसूण पाकळ्या
3) थोडं आलं
4) 1 लाल सुकी मिरची - तुकडे करून
5) 1 मध्यम कांदा लांबट चिरून
6) 5-6 कढीलिंबाची पानं
7) थोड्या कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या
8) 2 मध्यम टोमॅटो - चिरून
9) 1/2 टीस्पून भाजलेल्या जिर्याची पूड
10) 1/4 टीस्पून लाल तिखट
11) मीठ
फोडणीसाठी -
1) 2 टीस्पून तेल
2) 1/2 टीस्पून मोहरी
3) 1/2 टीस्पून उडिद डाळ
4) 5-6 कढीलिंबाची पानं
5) 1 लाल मिरची
6) 1/4 टीस्पून हिंग
Негізгі бет अशी करून बघा - मऊ लुसलुशीत इडली आणि लाल चटणी
Пікірлер: 55