मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या दक्षिण बाजूला आरे कॉलनी वसलेली आहे. तिथं जाण्यासाठी गोरेगाव, जोगेश्वरी तसंच पवई या परिसरातून चांगल्या रस्त्याची सोय आहे.
मुंबईच्या आरे दूध कॉलनीला मुंबईचं फुफ्फुस म्हणून पण ओळखतात. मेट्रो लाइनसाठी मेट्रो शेड बांधण्याची योजना असल्यानं या भागात मागील दोन वर्षांपासून झाडं तोडली जात आहेत. याचाच विरोध पर्यावरण प्रेमी करत आहेत. मात्र, आता आरेत कारशेड बनवण्याची योजना रखडली असून कांजूरमार्ग इथं मेट्रो शेड तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
आरे कॉलनी परिसरात पवई तलाव, विहार सरोवर हे तलाव आहेत. तसंच परिसरामध्ये फिरण्यासाठी उद्यानही आहे. १९७७ मध्ये आरे जंगलातील २०० हेक्टर क्षेत्रावर फिल्म सिटीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. याच परिसरातून पुढे गेलं की, दादासाहेब फाळके चित्रपटनगरी आहे. या ठिकाणी अनेक चित्रपट तसंच मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं.
आरे कॉलनी म्हणून ओळखला जाणारा हा भूभाग १९५१ साली सरकारच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडे देण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याची पायाभरणी केली होती, असं सांगितलं जातं.
Негізгі бет Aarey colony & powai lake nearest place only 10km! Mumbai ki monsoon places!
Пікірлер