#AjitPawar #NCP #Baramati #Mahayuti #VidhansabhaElection2024
बारामतीतून आज अजितदादा यांचा मेळावा होत आहे. लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे. बहुप्रतिष्ठित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातूल लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं. आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या, असे ते म्हणाले होते. बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले होते. मात्र बारामतीमधून नव्हे तर मग अजित दादा कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.
Негізгі бет Ajit Pawar LIVE : हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होताच दादांचा मेळावा, बारामतीत काय घडतंय?
Пікірлер: 10