Tukaram maharaj abhang sung by baba maharaj satarkar
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोवा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर ॥४॥
Негізгі бет Akhand jaya tuzi preeti | tukaram maharaj abhang
Пікірлер: 39