This is new aarti of devi Yogeshwari (Ambejogai)
Singer-Devyani karve kothari and ujjwala karve
Lyrics-Narayan Bapat
Track-Mr.vijay nanda
Video by lakhdatar creators..
for any inquires call 9082670037
आरतीचे शब्द
हे घ्या
दंतासुर मर्दिनी कुमारी अंबाजोगाई
भवानी अंबाजोगाई
भाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई
दो नेत्रांच्या निरांजनाने तुजला ओवाळू माते तुजला ओवाळू सत्कर्माचा धूप सुगंधी तुझ्यापुढे जाळू
तवा पदकमली लीन निरंतर
पाव झणी माते मजला पाव झणी माते
धावत येईल अघराशींचा नाश
करायाते
सदभावांच्या फुले वेलींवर भक्ती फुले आली माते भक्ती फुले आली वेचूनिया ती पदकमलांवर प्रेमे अर्पियली
तुझ्या कृपेने दैन्य दुःख ही लोपूनिया गेले वरदे सौख्य घरा आले
शांती सुखाने मानस माझे आनंदित झाले
योगेश्वरी हे कुलस्वामिनी आशीर्वच द्यावा मजला अाशीर्वच द्यावा
तव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा
नारायण नतमस्तक चरणी प्रार्थितसे आई, प्रेमे प्रार्थितसे आई
ह्रदयमंदिरी वास कराया यावे लवलाही.
Негізгі бет Музыка Ambajogai Yogeshwari aarti(lyrics in description)
Пікірлер: 307