नवीन गोष्टीचे त्यातल्या त्यात पहिल्या गोष्टींचे नेहमीच आपल्याला अप्रूप असते पहिली कोणतीही गोष्ट अविस्मरणीय असते. असं म्हणतात "जगून जगावं तर असं जगावं इतिहासानेही एखादं पान आपल्यासाठी राखून ठेवाव." असंच सोनेरी क्षण सोनेरी दिवस माझ्यासाठी ही घडला माझ्यासाठीच नव्हे तर पुण्यातील 111 जणांसाठी ठरला केशव शंखनात पथक पुणे आपली भारतीय संस्कृती यामध्ये शंख वाद्याला खूप महत्त्व आहे शंख माहीत होता वाजवतही होते पण त्याचे रीतसर प्रशिक्षण घ्यावे असे वाटले युट्युब वर असल्याने शंख पथकाचा व्हिडिओ घेतला आणि या ग्रुपची सभासद झाले भारतातील पहिले शंख वादन पथक हे याचं वेगळेपण होते याचे संस्थापक श्री नितीन महाजन सर यांनी सुरू केलेले पथक पुण्यातील गणेशोत्सव नवरात्रीमध्ये शंख वादन केल्याने खूप प्रसिद्धी तर मिळाली पण त्याचबरोबर अनेक संधी येऊ लागल्या त्यातील खूप मोठी संधी म्हणजे ऐतिहासिक असे अयोध्या येथील श्रीराम मंदिर स्थापनेसाठी पथकातील 111 जणांची शंख वादनासाठी निवड होणे अद्भुत असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये शंख वादन करणे हे एक सुवर्णसंधी होती घरातून मी कधीही बाहेर न जाणारी सर्वात मोठा प्रवास या निमित्ताने झाला पुणे ते आयोध्या 111 जण कडाक्याची थंडी आणि यामध्ये प्रवासात प्रयाग काशी अयोध्या आयुष्यातील पहिला मोठा प्रवास तोही अविस्मरणीय झाला या प्रवासात सर्व पथक हे एका परिवारासारखे होते अनेक व्यक्ती त्यांचे स्वभाव अनुभव नवीन ठिकाणे नवीन प्रदेश तेथील वेगळी खाद्य संस्कृती हे भरभरून मी घेत होते प्रवासात 111 जण हे एकमेकांना खूप जपत होते वय वर्ष चार पासून ते 85 वर्ष वयाचे अनेक महिला आणि पुरुष यामध्ये होते काशी येथील गंगा आरती काशी विश्वेश्वराचे मंदिर प्रयाग येथील त्रिवेणी संगम आणि अयोध्येतील श्री राम मंदिर हनुमान गढी ही येथे स्थिर शंखवादन त्याच बरोबर संभळवादन करणारे तीन जन होते हे सर्वच सोनेरी क्षण आणि सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवणारा दिवस ठरला ज्या दिवशी आयोध्या येथे मंदिरात वादन केले सलग वादन करून श्रीरामाला डोळे भरून पाहून अक्षरशः आनंदाने फक्त अश्रुधारा वाहत होत्या रामाकडे कोणतीही मागणी नाही की अपेक्षा नाही भरभरून डोळ्यात श्रीरामाचे रूप फक्त साठवून घेतले शंख वाचन करून कारसेवा पुरम मध्ये आम्हा 111 जणांची सर्व सोय केली होती तेथील जेवण सर्व सोयी ह्या उत्तम होत्या खूप मोठ्या प्रमाणात थंडी असूनही कोणाला कोणताही त्रास झाला नाही की पाणीही बांधले नाही सात्विक जेवण गरम पाणी यामुळे शंख वादक सर्वजण उत्तम होते केशव शंकनाथ पथकाचे आमचे नितीन सर यांच्यामुळे सर्व वादकांना उत्तमरीत्या हा मोठा प्रवास काशी विश्वनाथ दर्शन प्रयागचे त्रिवेणी संगम शरयू नदी गंगा आरती हनुमान गडी हे सर्व अप्रूफ वाटणाऱ्या गोष्टी खूप जवळून भरभरून पाहता आल्या श्रीरामाचे मंदिर आणि तेथील अद्भुत अशा सर्वच गोष्टी श्रीरामाचे अस्तित्व हे त्या मातीच्या कणाकणात जाणवत होते हा सर्व प्रवास आणि प्रवासात सर्वांची काळजी घेणारे युवा वर्ग नितीन सर डोमाळे काका आणि माई यांचे योगदान खूप छान होते सर्व वयोगटातील व्यक्ती असल्याने अयोध्येचे शंख मादन हे ऐतिहासिक घडविणारे ठरले या पथकामध्ये 111 जणांपैकी 80% या महिला होत्या हे त्यातूनही वेगळेपण होते यामुळेच अयोध्या येथील शंख वादन हा एक इतिहास ठरला यापुढे अनेक जण अयोध्येला येतील आणि जातील पण या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार खूप कमी लोकांना होत आले त्यातील मी एक होते यासाठी स्वतःचा कौतुक आणि अभिमान तर वाटलास त्याचबरोबर सर्व वादक केशव शंखनाद पथक यांनी दिलेली ही आयुष्याची शिदोरी नेहमीच लक्षात राहील यासाठीच सर्वांचे अगदी मनापासून शतशः आभारी आहे. प्रा. दीपिका जंगम गुरुवार पेठ पुणे 7709225334
Негізгі бет Ойын-сауық अयोध्या एक अविस्मरणीय प्रवास आणि अनुभव 🙏🤗🚩 भाग २
Пікірлер: 1