चांदवडच्या वाहेगाव साळच्या जवानाचा अपघाती मृत्यू.
शासकीय इतमामात शाश्रु नयनांनी अखेर निरोप...
सजविलेल्या वाहनातून काढण्यात आली अंत्ययात्रा...
चांदवड : अपघाती निधन झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान तेजस जयवंत आहेर यांच्या पार्थिवावर चांदवडच्या वाहेगाव साळ या मूळगावी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शाश्रु नयनांनी तेजस आहेर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.तत्पूर्वी सजलेल्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी "अमर रहे अमर रहे "तेजस आहेर अमर रहे "भारत माता की जय ,वंदे मातरम,च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री वर्षांची मुलगी आरोही, 4 वर्षांचा मुलगा आदित्य, आई भाऊ असा परिवार आहे.
भूमीपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चैनल आणि फेसबुक पेजला कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका..
Негізгі бет चांदवडच्या वाहेगाव साळच्या जवानाचा अपघाती मृत्यू ; शासकीय इतमामात शाश्रु नयनांनी अखेर निरोप...
Пікірлер