Hello everyone..
Welcome to my channel Angel Daisy Art & Craft.
In today's video I'm showing you how to make aai cha nirop for Maharashtrian rukhwat.
Please like, share & subscribe my channel for more interesting videos.😊
आईचा निरोप
नमस्कार करतेस?
शुभ आशीर्वाद
जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल,
मग डोळ्यात अश्रू का?
अगं सगळेच या वाटेने जातात.
पहिला मायापाश तोडणे कठीण,
पण नवीन जोडणे त्याहून कठीण,
माहेरची नाती जोडायची असतात.
सासरची नाती जोडायची असतात.
ती अशी जोडायची असतात की,
जोडणी दिसत कामा नये.
आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले,
आता मात्र तुला दुसऱ्याचे
हट्ट पुरवायचे आहेत.
सासू, सासरे, दिर, नणंद, अन पती,
एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना
दुखावता कामा नये.
या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार!
आता प्रत्येक क्षण म्हणजे परीक्षा,
अनिर्णीत परीक्षा म्हणजे संसार,
आता तू परीक्षेला बसणार,
पास नापास मात्र आई-वडील,
तू विद्यार्थिनी,
निकाल मात्र
नियतीच्या हाती.
या जगवेगळ्या परीक्षेचे नाव
म्हणजे संसार!
आता प्रत्येक क्षणी हार जीत
पाचवायचे सामर्थ्य संसारात हवे.
मात्र फळाची अपेक्षा न करता
करत जायचे. चांगले पेरले तर
चांगलेच उगवते.
आई-वडिलांचा आशीर्वाद,
पूर्वजांची पुण्याई आणि
हितचिंतकांच्या शुभेच्छा व
जीवनसाथीदाराचा आधार
धरलेला हात प्रियतम पतीचा आहे.
तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे.
हे लक्षात ठेव म्हणजे
संसारात समाधानी होशील.
जगाचा पाठीवर कोठेही राहा,
संसारातील अडचणींचा धिटाईने
सामना कर, यशस्वी होशील,
सुखी होशील.
|| श्री समर्थ कृपा ||
Негізгі бет आईचा निरोप रुखवत| Wedding Rukhwat Ideas
Пікірлер: 50