चंदुकाका सराफ अँन्ड सन्सचे वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन wedding jwelory destination
चंदुकाका सराफ अँन्ड सन्स यांच्या वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन चे महापौरांच्या हस्ते उद्धाटन
पिंपरी-चिंचवड : शहरातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँन्ड सन्स 'वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन' ही संकल्पना राबवित आहेत. सुवर्ण पेढीच्या लिंक रोड, चिंचवड येथील शाखेत या संकल्पनेचे पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते रविवारी दि.05/12/2021 रोजी उद्धाटन झाले. चोखंदळ ग्राहकांना सर्व दागिन्यांचे वन स्टॉप सोल्युशन मिळावे या हेतून ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.
यावेळी चंदुकाका सराफ अँन्ड सन्सचे अध्यक्ष किशोरकुमार जिनदत्त शहा,अतुलकुमार शहा, संचालक सौ संगिता शहा,डॉ सौ अंकिता शहा, आदित्य शहा,सम्यक शहा, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक महिला संघटना अध्यक्ष आणि आकांक्षा संस्थेच्या संस्थापिका तृप्ती रामाने, एमपीसी न्यूजचे अनुप घुंगुर्डे आदी आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौरांनी चंदुकाका सराफ यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक करत दालनाची पाहणी केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
" आमच्या असंख्य आणि चोखंदळ ग्राहकांना, एकाच छताखाली विविध प्रकारच्या अनन्य साधारण अशा दागिन्यांची मेजवानी प्रदान करण्याच्या प्रेरणेतून 'वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन' ही संकल्पना आम्ही विकसित केली आहे .
या वन स्टॉप सोल्युशन असलेल्या वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन च्या नवीन संकल्पनेचे उद्गाटन आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरेताई यांच्या हस्ते झालेले आहे . याबद्धल आम्हाला खूप आनंद झालेला आहे . चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लि. 'वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशनमध्ये' आपल्याला मिळतील .नववधुच्या शृंगाराकरिता सोने आणि हिऱ्याचे आकर्षक दागिने त्याबरोबर लग्नसोहळ्या करिता लागणाऱ्या इतर सर्व आवश्यक सेवा ज्यामध्ये संपूर्ण लग्नघराची तयारी एकाच ठिकाणी करता येईल.तरी या 'वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशनला' आपण सर्वांनी आवश्य भेट द्या आणि आपल्या मनातील दागिने आवडीप्रमाणे खरेदी करा - किशोरकुमार जिनदत्त शहा चेअरमन,चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा.लि
#चंदुकाका सराफ अँन्ड सन्स #वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन#पिंपरी चिंचवड #बारामती न्युज#dnyanpravahnews#baramati #Chandukaka Saraf and sons
Негізгі бет चंदुकाका सराफ अँन्ड सन्सचे वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन wedding jwelory destination
Пікірлер