चविष्ट बीट बटर पावभाजी, आवडीने खाऊ घालू अशी बीट बटर पावभाजी रेसिपी | Pav Bhaji Marathi |
साहित्य:
1. 300 ग्रॅम बटाटा
2. 300 ग्रॅम बीट
3. 400 ग्रॅम हिरवा मटार
4. 400 ग्रॅम टोमॅटो
5. 400 ग्रॅम फ्लॉवर
6. 300 ग्रॅम गाजर
7. 400 ग्रॅम शिमला मिरची
8. 50 ग्राम फरसबी
9. 2. 1/2 पळी तेल
10. 3 मोठे कांदे
11. 2 चमचा लसणाची पेस्ट
12. 1 छोटा चमचा हळद
13. 2 दोन चमचा लाल मिरची पावडर
14. 3 चमचा एव्हरेस्ट पावभाजी मसाला
15. 3 चमचा तूप गायीचे साजूक
16. चवीनुसार मीठ
17. अमूल बटर
18. बारीक कोथिंबीर चिरून
19. पावाची लादी
कृती:
प्रथम भाज्या आपण स्वच्छ धुऊन घेतल्या नंतर कुकरचा एक डब्बा घेऊन त्यामध्ये आपण बटाट्याचे दोन तुकडे करून 300 ग्रॅम बटाटा कुकरच्या डब्यात घालून घेतला. त्यानंतर त्याच डब्यामध्ये आपण बीट स्वच्छ धुऊन त्याची वरची साल काढून बीट पण आपण 300ग्रॅम घालून घेतले. बीट घातल्यानंतर आपण हिरवा मटार 400 ग्रॅम घालून घेतला . एका ग्लासापेक्षा थोडं पाणी कमी पाणी घालून घेतले. नंतर आपण कुकरचा दुसरा डब्बा लावायला घेतला त्यामध्ये 400 ग्रॅम टोमॅटो घालून घेतला 50 ग्रॅम फरसबी घालून घेतली बारीक तुकडे करून. फ्लावर पण आपण 400 ग्रॅम घालून घेतला. फ्लावर घालताना आपण तो पहिल्यांदी साफ करून त्याचे तुकडे करून घेतले. या डब्यामध्ये पण आपण एका ग्लासापेक्षा कमी पाणी घालून घेतले. आता आपण तिसरा डब्बा लावायला घेतला गाजराची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले. गाजर आपण 300 ग्रॅम घेतले. शिमला मिरची 400 ग्रॅम घेतली .शिमला मिरचीचा बी काढून टाकले आणि त्या शिमला मिरचीचे तुकडे करून घेतले. इथे पण आपण एका ग्लासापेक्षा कमी पाणी घालून घेतले. कुकरचे झाकण लावून आपण पाच शिट्या काढून घेतल्या .पाच शिटी झाल्यानंतर थंड करत ठेवले .एक जाड बुडाचे भांडे गरम करून घेतले मध्यम आचेवरती .आणि त्या भांड्यामध्ये आपण अडीच पळी तेल घालून घेतले .तेल पूर्णपणे तापल्यानंतर आपण तीन मोठे कांदे बारीक चिरून घातले .कांदा पूर्ण गुलाबी रंगावरती परतून घेतला. तेल जरा थोडे आपण इथे बेताचेच घालून घेतले आहे. पावभाजी नेहमीपेक्षा चमचमीत होण्यासाठी अडीच पळी तेल घालून घेतलेले आहे. कांदा पूर्णपणे मऊ पडेपर्यंत गुलाबी रंगावरती व्यवस्थित परतून घेतला .आणि त्याच कांद्यामध्ये आपण दोन चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेतली .ती पण चांगली परतून घेतली पूर्ण लसणीचा वास जाईपर्यंत आपण कांदा मध्ये व्यवस्थित परतून घेतली. एक छोटा चमचा आपण हळद पण घालून घेतली .ती पण व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर आपण दोन चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली. मिरची पावडर ही आपण व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर आपण एव्हरेस्ट पावभाजी मसाला दोन चमचा मसाला घालून तो ही व्यवस्थित परतून घेतला. सगळं मिश्रण आपण एकत्रित व्यवस्थित परतून घेतले. तीन चमचा गाईचे साजूक तूप पण घालून घेतले. कुकर थंड झाल्यानंतर आपण बीट आणि टोमॅटो एका भांड्यात काढून घेतले टोमॅटोची साल काढून टाकली. आणि बीट आणि टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेतले. त्याची पूर्णपणे आपण पेस्ट बनवली आणि बीट टोमॅटो अगदी व्यवस्थित मिळून येण्यासाठी आपण मिक्सरला फिरवून घेतले त्यामुळे बीट बटर पावभाजीचा कलर येतो छान आणि बी बटर पावभाजी लागते पण छान आणि मुले आवडीने खातात. मिक्सरला फिरवलेले बीट टोमॅटो आपण घालून घेतले त्यानंतर आपण इतर भाज्या पूर्णपणे व्यवस्थित स्मॅश करून घेतल्या. स्मॅश केलेल्या भाज्याआपण घालून घेतल्या चार-पाच चांगल्या उखळ्या आणून दिल्या .जेवढी आपल्याला बीट बटर पावभाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढेच आपण एका वेळी कुकरला पाणी घातलेले आहे. आपण कुकरमध्ये घातलेलेच पाणी इथे वापरणार आहे. बाकी दुसरं पाणी आपण येथे घालणार नाही त्यामुळे बीत बटर पावभाजीची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला पाहिजे तशी व्यवस्थित होणार आहे. परत पुन्हा आपण इथे एक चमचा पावभाजी मसाला घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतले. त्यानंतर एक मोठा अमूल बटर चा तुकडा घालून घेणार आहोत . इथे बारीक चिरून कोथिंबीर पण आपण घालून घेणार आहोत. एकसारखे मिश्रण एकत्रित करून ढवळून घेणार आहोत. इथे आपली बीट बटर पावभाजी तयार झालेली आहे. एक जाड तवा ठेवून त्यामध्ये आपण बटर घालून घेणार आहोत बटर घातल्यानंतर जसे वडापावला आपण मध्ये कट करतो तसे आपण पाव कट करून मधला भाग आधी पूर्णपणे खरपूस शेकून घेणार आहोत .आणि त्यानंतर आपण बाहेरून पाव व्यवस्थित खरपूस शेकून घेणार आहोत .अशा पद्धतीने आपण सगळे पाव व्यवस्थित एकसारखे खरपूस भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर आपण बीट बटर पावभाजीची चव घेतली आणि त्याबरोबर लिंबू कांदा पण घेऊन बीट बटर पावभाजीची चव चाखून घेतली आणि पावभाजी मध्ये बटर चा चांगला तुकडा पण घालून घेतला.
Your Queries:- Mumbai Pav bhaji recipe
Marathi Pav Bhaji masala
Pav Bhaji
Pav bhaji recipe
Pav bhaji recipe in Marathi
Easy Pav Bhaji
#pavbhaji
#pavbhajirecipe
#paobhaji
#pavbhajilovers
#cookingvideo
#simplecooking
Thanks for watching ☺️.
.
Негізгі бет चविष्ट बीट बटर पावभाजी, आवडीने खाऊ घालू अशी बीट बटर पावभाजी रेसिपी | Pav Bhaji Marathi |
Пікірлер: 2