#लीनाजसुगरणकट्टा #आमटी #चिंचगुळाचीआमटी #तूरडाळीचीआमटी #लीनाजोशी
चिंच गुळाची आमटी
शिजवून घेतलेले वरण (तूरडाळ)
तेल ३ चमचे
राई १ चमचा
जिरे १ चमचा
हिंग अर्धा चमचा
मेथ्याचे ५-६ दाणे
कडीपत्याची ८-१० पाने
हळद अर्धा चमचा
तिखट दीड चमचा
गोडा मसाला दीड चमचा
गूळ लिंबाएवढा
चिंचेचा कोळ अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
थोडी कोथिंबीर
शिजवलेले वरण रवीने घोटून घ्यावे.
मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे. मग त्यात राई, जिरे, मेथ्या, हिंग आणि कडीपत्ता घालून फोडणी करावी. मग त्यात १ पेला पाणी घालावे. पाण्यात हळद, तिखट, गोडा मसाला आणि कोथिंबीर घालावी. मग त्यात वरण घालावे. लागेल तसे पाणी घालावे. Same त्यात गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून नीट उकळून घ्यावे.
आमटी छान उकळली की तिची चव वाढते.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
Негізгі бет Chinch gulachi aamati | Leena's Sugrankatta | चिंच गुळाची आमटी | तूरडाळीची आमटी
Пікірлер: 53