महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक विहिरी तत्कालिन इतिहासाची आजही साक्ष देताना दिसतात. स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात अशीच एक विहीर आहे. बाजीराव पेशवे यांनी बांधलेली विहीर बाजीराव विहीर म्हणूनच ओळखळी जाते. विशेष म्हणजे शुक्रवार पेठेत असणारी ही विहीर दोन मजली आहे. अत्यंत सुंदर दगडी बांधकाम आणि शंभर फुटावून जास्त खोली असलेल्या विहिरीनं कित्येक पिढ्यांची तहान भागवलीय.
#Stepwell_heritage
#Bajirao_vihir
#Heritage_of_Maharashtra
#Satara_pride
#Indian_post
#Post_stamp
#बारव
#पुष्करणी
#watermanagement
#jalmandir_palace
#Bajirao_vihir_kuthe_aahe
#Bajirao_vihir_satara
#stepwellsinmaharashtra
#biggeststepwellinindia
#ranidivaav
#whatismeanbystepwell
#पायरी_विहिर_म्हणजे_काय?
#Which_is_biggest_stepwell_in_maharashtra
#Which_is_biggest_stepwell_in_pune
#Which_is_biggest_stepwell_in_satara
सातारकर छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या मोहिमा आणि इतिहासाची बाजीराव विहीर साक्षीदार आहे.
बाजीराव विहिरीला एकूण सात कमानी आहेत. त्यामुळे सात कमानीची विहीर म्हणूनही विहिरीची ओळख आहे. विहिरीच्या मुख्य कमानीवर राज चिन्ह, दोन शरफ शिल्प आणि थोरले शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांचे शिल्प कोरलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरींमध्ये बाजीराव पेशव्यांची विहीर ही तिसऱ्या क्रमांकावर येते. सध्या या विहिरीची मालकी छत्रपतींचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्याकडे आहे.
सातारा शहराचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील ही विहीर असल्याचे सांगण्यात येते. या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असे. या विहिरीच्या वरच्या भागामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांची भेट होत होती. अनेक मोहिमा या विहिरीमध्ये भेट झाल्यानंतर ठरल्याचेही सांगण्यात येते. विशेष म्हणजे गेल्या 300 वर्षांच्या इतिहासात ही विहीर कधीही आटली नाही.
बाजीराव पेशवे विहिरीचं 2023 मध्ये राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त स्टेप वेल हेरिटेज अंतर्गत पोस्ट तिकीट बनवण्यात आलं. यामुळे ऐतिहासिक बाजीराव पेशवे विहिरीला मोठा सन्मान मिळाला आहे,
जलमंदिर परिसरातील बाजीराव विहीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरातन विहिरीचे छायाचित्र राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याने पोस्टकार्डवर छापण्यास ११ ऑक्टोबर पासून सुरुवात केली आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र येथून पुढे छापण्यात येणाऱ्या पोस्टकार्डवर असणार आहे. ही अत्यंत अभिमानास्पद व सातारच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून सन्मानीय घटना आहे. एमआयटी स्कूल ऑफ आर्किटक्चर पुणे यांनी रोहन काळे, राजेश कानिक यांनी अनेकांच्या सहकार्याने, शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करुन परिश्रमपूर्वक दिलेल्या योगदानाचे निश्चितच कौतुक आहे.@Mivatsaru
Негізгі бет दोन मजले आणि 7 कमानी, महाराष्ट्रातील ऐतिहासिक बाजीराव विहीर पाहिलीत का? | Stepwell Heritage Satara
Пікірлер: 19