देवीचा गजर:-वाघावर बसली नवसाला पावली
गजर रचनाकार :-भजनमहर्षी बुवा श्री गोपीनाथ बागवे
गायक:-कु.ओंकार आडिवरेकर
ढोलकी वादक:-कु.सागर रावराणे
गजर
वाघावर बैसली नवसाला पावली |
क्रोधे मारीला महीशासूर ||
या जोगेश्वरी मातेचा आम्ही करुया गजर || ध्रु ||
भवानी म्हणू की दुर्गाई तुजला |
अनेक रुपात संचार केला ||
चारी वेदानी महीमा गाईला थकुन गेले सुरवर || १ ||
अश्विन महिना शुद्ध ती नवमी |
दहाव्या दिवसाची युक्ती नामी ||
मध्यानीचा सुर्य प्रकटला दैत्य मारीला अतिक्रुर ||२||
हिमालया मध्ये देवी पार्वती |
कुणी अंबा जगदंबा म्हणती ||
भवानी रुपात पावे मला ती नशीब अमुचे बलवत्तर ||३||
गर्जत राहो किर्ती अपुली |
वेडी वाकुडी महती गाईली ||
गोपीनाथ हा धन्य झाला तुझ्या कॄपेने खरोखर ||४||
Негізгі бет Музыка ||देवीचा गजर:-वाघावर बसली नवसाला पावली || गायक:-कु.ओंकार आडिवरेकर
Пікірлер: 51