Lyrics: Vikas Waghmare
राशीनपुरी अंबेचा अवतार झाला, दैत्य दानवाचा भ्रम फोडीला
अपुल्या भक्ताशी अधिकार दिधला, दैत्यमर्दीनी चरणी सुग्रीव स्थापिला
जय देवी, जय देवी, जय जय अंबिके
आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू, त्रिगुणव्यापीके, जय देवी, जय देवी ॥ १ ॥
सनमुख दीपमाला कल्लोळोवेळी, क्षेत्र पाळ भैरव आहे तवद्वारी
नारायण देव दत्तात्रय अवतारी, जमदग्नी सहीत नांदे सुंदरी
जय देवी, जय देवी, जय जय अंबिके
आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू, त्रिगुणव्यापीके, जय देवी, जय देवी ॥ २॥
उत्तर भागी लिंगे देव वटेश्वर, पश्चिम भागी नांदे हरी तीर्थराय
मूळ पीठ अंबा देवाधि देव, भक्त विनवितो संपुर्ण भाव
जय देवी, जय देवी, जय जय अंबिके
आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू, त्रिगुणव्यापीके, जय देवी, जय देवी ॥ ३ ॥
#arti
#devi #navratri
Негізгі бет Devi Yemai Arti |
Пікірлер: 1