कविता - गाभारा
कवी - कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर
सादरीकरण - कल्याणी नेवे
चित्रीकरण, संकलन व दिग्दर्शन - प्रवीण जावळे
विशेष आभार - शिल्पा नेवे आणि अश्लेषा रांगणेकर
रुईया मराठी वाङ्मय मंडळ आणि जनसंज्ञापन व माध्यम विभाग मराठी (रुईया महाविद्यालय)
गाभारा
दर्शनाला आलात? या...
पण या देवालयात,
सध्या देव नाही
गाभारा आहे,
चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या समया आहेत,
हिऱ्याची झालर आहे.
त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा,
आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही.. तसं नाही,
एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज
Youthkatta Marathi हा साहित्यिक , सामाजिक घडामोडी याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे. या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. नवोदित साहित्यिकांना प्रस्थापित साहित्यिकांचे योग्य मार्गदर्शन देऊन साहित्याला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि त्यांना हक्काचा विचारमंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही कार्यरत आहोत.
अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
Facebook - / youthkattaa
Instagram - / youthkattaa
Email - youthkatta.marathi@gmail.com
KZitem _ @youthkattamarathi
All rights reserved ©Youthkatta Marathi
इतर विडिओ 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
@ Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala - • Aga bai arechya Marath...
@ Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti - • Andhashraddha nirmulan...
@ Marathi natak Most welcome - • Marathi natak Most wel...
@ Sunita Kapase: Inspiring Success Story of an Auto Riksha Driver- • Sunita Kapase: Inspiri...
@ जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Inspirational story of yash - • जगण्याचा 'दृष्टि'कोन द...
@ Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti special Poem - • Maybap Marathi Kavita ...
....................................................................................................
#kusumagraj
#kavita #marathikavita
#youthkatta #youthkattamarathi
कुसुमाग्रज यांच्या कविता
kusumagraj poem
कवी कुसुमाग्रज
Kavi kusumagraj मराठी भाषा दिन Marathi bhasha dinVi va shirwadkar marathi kavita Kusumagraj yanchi kavita
Kavi kusumagraj poem in marathi
kusumagraj kavita
कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता
kusumagraj kavita in marathi
Gabhara kavita
Негізгі бет गाभारा - कुसुमाग्रज | Kavi kusumagraj yanchya kavita | Marathi kavita
Пікірлер: 10