Keys : Dr. Abhijit Modak
Tabla : Rahul Soparkar
Original Credits :
lyrics : Shri. G. D. madgulkar
Music : Shri. Sudhir Phadke
रघुराजाच्या नगरी जाउन
गा बाळांनो, श्रीरामायण
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गांतुन, राजपथांतुन
मुक्त दरवळो, तुमचे गायन
रसाळ मूले, फले सेवुनी
रसाळता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरा मिळवुनी
लय-तालांचे पाळा बंधन
नगरि लाभता लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथा
उत्सुक होउन श्रवणाकरिता
करवितील ते तुम्हा निमंत्रण
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनी
थोडे थोडे गात प्रतिदिनी
पूर्ण कथेचे साधा चित्रण
नका सांगु रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढे बोला भाषण
स्वये ऐकता नृप शत्रुंजय
संयत असु द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण
नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचे मूल्य मुनिजनां?
अवघ्या आशा श्रीरामार्पण
Негізгі бет Музыка Ga Balanno Shri Ramayan - Geet Ramayan
Пікірлер: 13