ज्ञान प्रबोधिनी - सोलापूर
गणेशोत्सवानिमित्त युवक विभागातर्फे आयोजित
'वृक्ष आमचे संगोपन तुमचे, वृक्षारोपण अभियान'
निवेदन:
पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक वृक्षारोपण उपक्रम कोरोनामुळे मागे पडला आहे. म्हणून हा विषय ज्ञान प्रबोधिनी सोलापूरच्या युवक विभागाने हाती घेतला. यावर्षी ना ढोल ना ताशा तरीही तेवढ्याच उत्साहाने युवक विभागाने विविध उपक्रम संपन्न केले त्यातीलच हा एक. जो कोणी वृक्ष संगोपनासाठी तयार असेल त्याठिकाणी खड्डा खणून संरक्षक जाळीसह रोप लावू असे आवाहन केले. त्यास प्रतिसाद म्हणून आलेल्या मागणीनुसार १२७ रोपे ( ९६ - संरक्षक जाळ्या ) लावली. चिंच, उंबर, करंज, कडुनिंब, बेल, जांभूळ इत्यादी सावली देणाऱ्या वृक्षांचा यात समावेश होता.हा उपक्रम १५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२० या कालावधीत संपन्न झाला. वृक्षांची काळजीपूर्वक देखभाल व संगोपन करू अशी खात्री नागरिकांनी दिली आहे. तपशील खालील प्रमाणे-
परिसर वृक्ष संख्या
१. विजापूर रोड २८
२. पूर्व भाग १३
३. भवानी पेठ ०५
४. उमा नगरी ०९
५. पुणे नाका २३
६. रेल्वे लाईन्स ०८
७. सेटलमेंट १६
८. दहिटणे रोड १५
९. हैद्राबाद रोड ०२
१०. श्रीशैल नगर ०४
एकूण. १२७
उपक्रम प्रमुख :श्रेयस जहागिरदार
सहभागी युवक : सागर दिंडे , मोहनीश बारिया , अमन बागवान, ऋतुराज पाटील
Негізгі бет गणेशोत्सवानिमित्त युवक विभागातर्फे आयोजित 'वृक्ष आमचे संगोपन तुमचे' वृक्षारोपण अभियान.
Пікірлер: 1