घरातील वातावरण आनंददायी राहण्यासाठी सोपे उपाय || Vastu tips for Happiness and Peace in home (Marathi)
घरातील वातावरण आनंददायी राहण्यासाठी सोपे उपाय
१) कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे असेल, तर पाण्याच्या माठाकडे क्षणभर टक लावून पाहावे आणि मगच बाहेर पडावे. कामात यश मिळते.
२) घरातील पंख्यांचा चालू असताना खड्खड़ आवाज होत असेल, तर तो ताबडतोब दुरुस्त करुन घ्यावा.
३) बेडरुममध्ये दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करुनच झोपले पाहिजे. अशाप्रकारे झोपल्याने मनःशांती लाभते. सकाळी झोपून उठल्यावर ताजेतवाने वाटते.
४) आहारात दुधाऐवजी शक्य तेथे दह्याचा समावेश करावा. मटण, दारु किंवा तेलकट पदार्थ शक्यतो कमीत कमी खावेत.
५) सूर्योदयापूर्वी उठून अंगण स्वच्छ झाडून घ्यावे.
६) कापलेली भाजी कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. मळलेल्या कपड्यांत धुतलेले कपडे मिसळू नयेत.
७) महत्त्वाचे कागदपत्र, दस्तावेज, कोर्टाच्या फायली नेहमी उत्तरेला दिशेला उघडणाऱ्या कपाटातच ठेवाव्यात.
८) दरवाजा उघडताना वा बंद करताना त्याचा कर्रकर्र आवाज होऊ नये, याची काळजी घ्यावी.
९) प्रफुल्लित, आनंददायक वातावरणासाठी रात्री झोपताना सौम्य सुगंधाचा सेंट, अगरबत्ती, सुगंधित फुले यांचा वापर करावा.
१०) पाण्याने भरलेले जग किंवा ग्लास टेलिफोनजवळ, मोबाईलजवळ कधीही ठेवू नये.
११) आपल्या आराध्य दैवताचे रोज स्मरण करावे.
१२) रोज सायंकाळी आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावा.
१३) घरातील सजावट, पडद्याचे रंग आपल्या राशीला अनुकूल ठेवावेत.
१४) घरातील ईशान्य कोपरा मोकळा व स्वच्छ ठेवावा.
१५) जेवण नेहमी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड करुन करावे. दक्षिणेला तोंड करुन कधीही जेवू नये.
१६) तिजोरी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे उघडणारे असावे.
१७) घरासमोर कचऱ्याचा ढीग किंवा सांडपाणी साठू देऊ नये.
१८) नैऋत्य कोपरा रिकामा ठेवू नये. येथे अवजड वस्तू ठेवाव्यात.
१९) ईशान्य कोपऱ्यात देवघर असावे.
२०) पाण्याचा साठा उत्तर, पूर्व किंवा ईशान्येला असावा.
२१) पाणी नेहमी बसून पूर्वेकडे वा पश्चिमेकडे तोंड करुन प्यावे.
२२) श्रृंगार कक्ष नेहमी नैऋत्य कोपऱ्यात असावा आणि उत्तरेकडे तोंड करुन कपडे घालावेत.
२३) स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यातच असावे. आग्नेय ही अग्नि देवतेची दिशा आहे.
२४) स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल तर घरात मानसिक ताण-तणाव वाढतात. भांडणे, अबोला, क्लेश वाढतात.
२५) स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असेल तर घरगुती सौहार्द बिघडते. घरातील प्रेम भाव कमी होतो.
२६) दक्षिणेकडे पाय करुन झोपू नये. ती मृत्यूची देवता यमाची दिशा आहे.
वास्तुशास्त्रातील या नियमांचे पालन केल्यास घरात सुख, समाधान, समृध्दी नक्कीच येईल. तसेच शांत, सुसंस्कृत, एकोप्याचे वातावरण राहील.
पती पत्नी यांच्यातील मधुर संबंध आयुष्यभर टिकून राहावे, यासाठी बेडरूमचे वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचे आहे. बेडरूमचे वास्तुशास्त्र जाणून घेण्यासाठी कमेन्ट मध्ये “बेडरूम” असे नक्की लिहा.
ॐ नमो नारायणा
Негізгі бет घरातील वातावरण आनंददायी राहण्यासाठी सोपे उपाय || Vastu tips for Happiness and Peace in home (Marathi
Пікірлер: 137