स्थळः कृष्णालय तिरुमना मंडपम गुडनगरम रोड, बोस पेठ, गुढीयात्तम आनंदाचे आवरू मांडू जगा। ध्यास घेवून म्हणजे त्रिजगतास आनंदी करण्याची स्वप्न ज्ञानोबारायांनी पाहिले. सर्व सृष्टी आनंदमय व्हावी. यातना समुळनष्ट व्हाव्यात माणसातील षड् विकार संपून ईश्वर जागृत व्हावा, या ध्यासाने माऊलींना ज्ञानेश्वरीचे अमृतपान आम्हाला दिले. आम्ही मद, मोह, मत्सर, द्वेष, क्रोध अहंकार या षड् विकारांनी टचटचून भरलो आहोत. व्यसनांच्या आहारी गेलो आहोत. या दलदलीतून बाहेर पडायचे असेल तर आपल्या जीवनात ईश्वराचे अधिष्ठान हवे. जीवन आनंदमय, सुखमय व्हावे, सर्वत्र आनंदाचे आवार निर्माण व्हावे, माणसाच्या अंतःकरणात असणारा परमेश्वर जागृत व्हावा, या निष्ठेने आम्ही हा सोहळा साजरा करीत आहोत. माऊली ग्रुप गुडीयात्तम, वेल्लोर, आरकाट, चित्तुर यांच्या सहकार्याने तसेच सज्जन भाविक जिज्ञासु, ईश्वरप्रेमी जनता जनार्दनास कळविणेस आनंद वाटतो की, कृष्णालय तिरुमना मंडपम गुडनमर टोड, चोस पेठ गुढीयातम येथे पारायणाचार्य श्रीमद सद्गुरू
सत्येंद्रनाथ स्वामी महाराज यांचे प्रेरणेने, साधू संताच्या कृपाशिर्वादाने व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली 16 वर्षे अखंड श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या वर्षी सोहळा 17 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. तरी सर्व भावीक भक्तांनी या अखंड सोहळ्याचा लाभ घ्यावा.
Негізгі бет ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह गुढीयातंम PRAVACHAN KIRTAN 4
Пікірлер