गुढी उभारण्यासाठी सर्वात प्रथम लागणारी वस्तू म्हणजे एल लांब काठी. तुम्हाला जितक्या उंच गुढी उभारायची आहे, तितक्या उंचीची काठी घ्या आणि हि काठी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.काठी चांगली स्वच्छ केल्यांनतर त्यावर रेशमी कापड किंवा साडी चांगल्याप्रकारे बांधा. कापडाची घडी न घालता. व्यवस्थित निऱ्या करून ते काठीला बांधा.त्यानंतर या काठीला साडीसोबतच कडुलिंबाची पानं, आंब्याची पाच पाने, फुलांचा हार आणि साखरेची माळ म्हणजेच गाठीदेखील बांधा. यानंतर त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या ठेवा.
गुढी उभारायची असलेल्या ठिकाणी चांगली स्वच्छता करून घ्या. या ठिकाणी छोटासा पाट ठेऊन त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढा. या पाटावर काठी ठेऊन गुढी उभारा.गुढी दोरीच्या साहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्या म्हणजे ती पडणार नाही.
गुढी उभारल्यानंतर तिची सुगंध, फुले, अगरबत्ती लावून तिची यथोचित पूजा करावी. नंतर गुढीला नैवैद्य दाखवावा. या दिवशी श्रीखंड-पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
गुढी संध्याकाळी सूर्यास्ताच्या उतरवली जाते. सायंकाळी हळद-कुंकु, फुलं, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करून गुढी उतरवा.
#gudipadwa #gudipadwa2024 #padwa #padwaspecialrangoli #gudi #padwa #trending #viral #yt #youtube #festival #celebration #family #marathi #newyear #vlog
Негізгі бет गुढीपाडवा 2024 | गुढी कशी उभारावी ? साडी कशी घालावी | Gudhi Padwa Puja Vidhi | साहित्य, पुजा विधि
Пікірлер: 5