।। गणेशोत्सव २०२४ ।।
स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवलेले, सोन्याचे नांगर फिरवलेले, सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर, Leading IT Hub अशी एक ना अनेक बिरुदावली मिरवलेले पुणे शहर.
आता हळूहळू आपली ही ओळख पुसून भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेले, गुंडगिरीचा अड्डा बनलेले, गलिच्छ राजकारणात गुरफटत चाललेले, बेशिस्त आणि असुरक्षित पुणे शहर. असे बनू लागले आहे.
याच सध्याच्या वातावरणाला वाचा फोडण्याची, सर्व जनमानसांत अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे बळ देण्यासाठी, या आपल्या सुंदर शहराला लागलेली कीड सर्वांसमोर आणणे जरुरी होते. म्हणूनच आपली सामाजिक जबाबदारी ओळखून आपल्या अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी संयुक्त लायन्स क्लब मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी जिवंत देखावा सादर केला आहे.
माँसाहेबांच्या स्वप्नातले, जे शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलेले स्वराज्य...!
पण हे ते स्वराज्य आहे का?
नाही... हे ते स्वराज्य नाही.
हे स्वराज्य आमुचे नाही.
गणेशोत्सव २०२४ देखावा
अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी संयुक्त लायन्स क्लब मित्र मंडळ
म्हसोबा चौक, दत्तवाडी, पुणे 30
देखाव्याची संकल्पना :- अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी संयुक्त लायन्स क्लब मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते 🙏🏼
#ganeshutsav #vignaharta #mazabappa #vignaharta #puneribappa #sarvajanikganeshutsav #bappamorya
Негізгі бет हे स्वराज्य आमुचे नाही.... लायन्स क्लब मित्र मंडळाने यावर्षी केलेला देखावा २०२४
Пікірлер