#shobhajagdalegappathroughkavyangan
दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर दर्शन - सर्वप्रथम मराठीतून
#Harihareshwar
#Kalbhairav
नमस्कार , माझ्या KZitem CHANNEL वर प्रथमच हरिहरेश्वर बद्दलची माहिती मी VIDEO च्या या भागात तुम्हांला सांगत आहे. हा विडिओ तुम्ही सर्वांसोबत share करा आणि तो आवडला तर नक्की comment box मध्ये कळवा.
हरिहरेश्वर किनारा हा मंदीर आणि आसपासच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणून मानले जाते.
हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर आणि स्वच्छ व निळाशर समुद्र, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसलेले सुंदरसे कौलारू हरिहरेश्वरचे मंदिर. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसर्या बाजुला निळाशार समुद्र यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत.
Негізгі бет Harihareshwar Darshan || दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर दर्शन || शोभा जगदाळे गप्पा through काव्यांगन ||
Пікірлер: 46