#BolBhidu #Congress #HaryanaElectionResults
मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल, अशी स्थिती होती. ९० पैकी ६५ जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पुढच्या एक ते दीड तासात हरियाणाच्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट आला. सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत मजल मारली. तर सुरुवातीच्या टप्प्यात ६५ जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकतं.
एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसच जिंकेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. काँग्रेस ५० ते ५५ जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला, तेव्हा काँग्रेस हरियाणात पुन्हा एकदा मागे राहिल्याचं दिसलं.आता हरियाणा विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना काँग्रेस इथं जिंकता जिंकता हरली, असं बोललं जात आहे. पण काँग्रेससोबत असं व्हायची पहिलीच वेळ नाहीये. याआधीही काँग्रेसच्या हातून चारवेळा डाव निसटला आहे. राज्यातली सगळी परिस्थिती नियंत्रणात असताना देखील काँग्रेसनं हरियाणासह एकूण चार राज्यात सत्तेची गमावलीय. आता हे राज्य कोणते आहेत, तिथं काँग्रेस जिंकता जिंकता निवडणूक कशी हरली? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Haryana Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh या ४ राज्यांमध्ये Congress च्या पराभवाची कारणं काय ?
Пікірлер: 195