Hedavde Mahalaxmi Mandir,महालक्ष्मी मंदिर #virar #gurumauli
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात काही मंदिरे अशी आहेत जी प्रसिद्धी पासून दुर आणि दुर्लक्षित राहिली आहेत. परंतू तेथे गेल्यावर आपल्याला शांतता आणि आनंद याचा अनुभव घेता येतो.असेच एक मंदिर विरार पूर्वेला असलेलं हेदवडे महालक्ष्मीमंदिर.तानसा नदीच्या काठावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले महालक्ष्मी देवीचे प्राचीन हिंदू मंदिर.स्वयंभू नवग्रहां सह स्वयंभू महालक्ष्मी मातेचे दर्शन येथे आपल्याला होते.मित्रांनो येथे जाण्यासाठी विरार येथून st बस सेवा उपलब्ध आहे साधारण 16 km वर हेदवडे हे गाव आहे तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून येतं असाल तर विरार फाट्या नंतर चा फ्लायओव्हर न चढता खनिवडे येथून डावी कडे वळून 2 km अंतरावर हे मंदिर आहे. विरार रेल्वे स्थानक येथून हेदवडे करिता रिक्षा ही उपलब्ध आहेत.वाटेत आपल्याला नवनीत एज्युकेशन लिमिटेड ही पुस्तकांची फॅक्टरी लागते. थोड पुढे गेल्यावर तानसा नदी दिसू लागते. येथूनच काही अंतरावर तानसा आणि वैतरणा नदी चा संगम आहे.मंदिर तानसा नदीच्या उत्तरेकडील तीरावर आहे. लांबूनच आपल्याला मंदिर दिसून येते. मंदिरा बाहेर पार्किंग साठी जागा आहे. हे मंदिर फक्त शुक्रवारी उघडते त्या मुळे त्या दिवशी गर्दी होते. मंदिरा समोर ओटी सामाना ची दुकानें दिसून येतात. मंदिर फक्त शुक्रवारी सकाळी 9:30 ते 6 या वेळात उघडते हे लक्षात ठेवा. मंदिरात प्रवेश करण्या अगोदर बाहेर एक शेषनागा चे मंदिर लागते. त्याच्या मागे सुंदर असा गावातला परिसर दिसून येतो.मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रचंड असा सभामंडप दिसून येतो. आणि सर्वप्रथम दर्शन होते ते पंचमुखी हनुमंताचे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती फार कमी ठिकाणी पहायला मिळते.त्यानंतर श्री कालभैरवाचे दर्शन होते.तेथून पूढे लहानसे गणेश मंदिर पाहून पुढे आपण मातेचा मंदिरात प्रवेश करतो. यामंदिरातील महालक्ष्मी ची मूर्ती वसईत राहणारे परपूज्य गुरुवर्य श्री दादासाहेब हाटे यांना हेदवडे येथे सापडली व मग त्यानी येथे छोटेसे मंदिर बांधले.नंतर या मंदिरा चा जीर्णोद्धार करण्यात आला.संपूर्ण ब्रह्मांडात ऊर्जा म्हणून वाहत असलेल्या मातेने हेदवडेला आपले निवासस्थान म्हणून निवडले.म्हणूनच या मातेचे दैवी रूप हेदवडे महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते. ती स्वयंभू आहे.ओम हे हिंदू श्रद्धेनुसार एक आध्यात्मिक आणि पवित्र सत्य आहे. ॐ 879 ही जादूई संख्या विशिष्ट संयोजनात ठेवल्यावर तयार होते.8 म्हणजे अष्टविनायक 7म्हणजे सप्तदेवता आणि 9म्हणजे नवग्रह.आपल्या दैनंदिन जीवनात या संख्यांचा अवलंब केल्यास आपल्याला दैवी संरक्षण आणि नशीब मिळण्यास मदत होते.. ही संख्या महालक्ष्मी मातेचा आशीर्वादही आहे , असा भाविकांचा विश्वास आहे.या मंदिराच्या परिसरात दत्तगुरु. मा सरस्वती आणि पंचमुखी गणपती यांची ही मंदिरे आहेत .पुढे स्वयं-प्रगट नवग्रह मंदिर आहे हे संपूर्ण जगात अशा प्रकारचे एकमेव मंदिर आहे. जिथे सर्व नवग्रह मूर्ती योग्य स्थितीत आणि योग्य दिशेने ठेवलेल्या आहेत ज्वालामुखीच्या लाव्हामधून मूर्ती नैसर्गिकरित्या एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडात विकसित झाल्या आहेत आणि त्या स्वत: पुनरुत्थित झाल्या आहेत आणि शास्त्रांमध्ये दर्शविल्याप्रमाणे योग्य दिशेने ठेवल्या आहेत. वरच्या स्तरावरून पाहिल्यास नवग्रहावर "9" अंक तयार होतो. बाजूला नवग्रह स्तोत्र लिहलेले आहे.
असे मानले जाते की हेदवडे महालक्ष्मी मंदिरातील नवग्रहाला पूजेने प्रार्थना केल्यास सर्व अडचणी किंवा ग्रहपिडा नाहीसे होतात.या मंदिरात भाविक आपल्या घरून भाज्या डाळ तांदूळ वगैरे घेऊन येतात. ते एकत्र करून महाप्रसाद बनविण्यात येतो. सर्वंनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.फक्त शुक्रवारी मंदिर उघडत असल्यामुळे मंदिरात गर्दी होते . तेव्हा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आल्यावर तुमच्याकडे पुरेसा वेळ असल्याची खात्री करा. मित्रांनो whatsup facebook instagram आणि इतर अनेक सामाजिक गोष्टींतुन वेळ काडून जर तुम्हाला खरी शांती आणि आनंद अनुभवायचा असेल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या.
instagarm :instagram.com/...
#virar#mahalakshmi #mahalaxmi #khaniwade #palghar #tansaariver #hedavde
#temple #navgrah #om #ganeshtemple #navgraha #mrathi #lakshmi #jivdanimandir #vasai #vaitarna
Негізгі бет Hedavde Mahalaxmi Mandir,महालक्ष्मी मंदिर
Пікірлер: 43