जि प मराठी शाळा लौकी येथे शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.. सरपंच सौ अक्काताई भील अध्यक्षस्थानी होत्या. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री ईश्वर मोरे, गावातील समाजसेवक श्री चंद्रकांत जाधव व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.. यावेळी इयत्ता दुसरी विद्यार्थी व वर्गशिक्षक श्री नंदलालजी धनगर यांचे कडून सर्व शिक्षकांचा उचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थी शिक्षकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका श्रीमती नंदा पाटील मॅडम व केंद्रप्रमुख करवंद श्री . चंपालाल पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदलालजी धनगर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमती जयश्री सावळे मॅडम यांनी केले.
Негізгі бет शिक्षक दिन 5/9/2024 - जि. प. मराठी शाळा लौकी ता. शिरपूर जिल्हा धुळे
Пікірлер: 2