जय हनुमान #maharashtra #pune #JayHanuman #jarandeshwar #satara सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पाडळी येथील विहंगम दृश्य असलेला हा मारुतीराया जरंडेश्वर चा मारुतीराया या नावाने प्रसिद्ध आहे.रामायणामध्ये भगवान राम आणि रावणाचे युद्ध सुरू असतानाच मेघनादाच्याबरोबर युद्ध सुरू असताना वज्रपानामुळे लक्ष्मणाला मुर्छा येते आणि त्यावेळी लंकेतील सुशेन वैद्यराज सांगतात की त्यांना शुद्धीवर आणायचा असेल तर हिमालयाच्या द्रोनागिरी पर्वतावरील संजीवनी औषधी लागेल ती संजीवनी औषध आणण्यासाठी बजरंग बली हनुमान द्रोनागिरी वर जातात पण तिथे त्यांचा संभ्रम होतो की नेमकी कोणती संजीवनी औषधी मग काय मग मारुतीराया चक्क द्रोणागिरी पर्वत सुचवतो आणि तो पर्वत उचलून थेट लक्ष्मणाच्या औषधासाठी हा पर्वत युद्ध स्थळावर घेऊन जातो त्यातीलच एक तुकडा खाली दंडकारण्यात पडतो आणि तो डोंगर पाडळी गावचा जरंडेश्वर या नावाने प्रचलित होतो.
सर्वांनाच माहिती आहे वैराग्याचं प्रति रूप आणि देवांचा देव म्हणजे शंभू महादेव भगवान शंकराचे प्रति रूप पाहायचं असेल तर ते कुठेतरी उंच डोंगरांमध्ये दुर्गम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अनेक डोंगर महादेवाच्या पिंडींनी सजलेले असतात आणि त्यापैकीच एक डोंगर आहे जो लाखो भाविकांना आकर्षित करतो तो म्हणजे साताऱ्याचा जरंडेश्वर कोरेगाव तालुक्यातला हा जरंडेश्वर हजारो लाखो भक्तांचे अति श्रद्धास्थान आहे. महादेवाचाच एकरूप जरंडेश्वर या जरंडेश्वराच्या दर्शनासाठी सातारा पुणे सोलापूर सांगली, कोल्हापूर जिल्हा सह राज्यभरातून व देशभरातूनही शंभू भक्त जरंडेश्वराच्या दर्शनाला येत असतात.
याच जरंडेश्वराच्या ठिकाणी देशभर प्रसिद्ध असलेली मिशा असलेली हनुमंताची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि याच हनुमंत रायाच्या दर्शनासाठी हजारो लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात. जरंडेश्वराच्या बाजूला अजिंक्यतारा, सांबरवाडी चा डोंगर यवतेश्वर डोंगरावरून छान पैकी नजरेच्या टप्प्यात येतो. मेरोलीन चा डोंगर सुळपणीचा डोंगर लांब धोक्यात हरवलेला वैरागड चंदन वंदन शिवतरची शेंडी आणि कल्याणगड देखील दिसतो. श्रावणात तर भक्तीचा महापूर या डोंगरावर पाहायला मिळतो.
असं सांगितलं जातं की या मंदिराच्या डोंगरावरती संजीवनी वनस्पती आहेत संजीवनी वनस्पती असलेले डोंगर म्हणून देखील प्रसिद्ध आहे पर्वत उचलून आणताना त्यातील एक तुकडा खाली पडला आणि त्यातच जरंडेश्वर हे नाव पडलं असं सांगितलं जातं. बारामती वरून 101 अंतर किलोमीटर असलेलं जरंडेश्वर तर साताऱ्यावरून निघायचं म्हटलं तर जाम मार्गे 15 किलोमीटर अंतर. समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीवरचे हे मंदिर.
Негізгі бет Ойын-сауық जरंडेश्वरचा मारुती! मिशीवाल्या मारुतीला कधी भेटलात?
Пікірлер