जय महाराष्ट्र पत्रकार संघ मराठी जगत व मैत्री संस्थेच्या वतीने आज हिशोब मेरी शाळा ताडदेव मुंबई, येथे भारताचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, डॉ. जी. जी. पारिख यांच्यासोबत वार्तालाप व संवादाचा कार्यक्रम नवपुत्रकारांसोबत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते :- सुरज भोईर व दीपक कलिंगन यांनी केले होते मुख्य प्रस्तावना पत्रकार :- स्वप्निल वाडेकर यांनी केली, पत्रकारांनी पारिख सरांना विविध प्रश्न विचारले त्यांनी सुद्धा स्वतंत्र आंदोलनापासून ते भारताच्या स्वातंत्र पर्यंत झालेल्या विविध घडामोडी संदर्भात मुक्त संवाद साधला नव पत्रकारांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लेखक :- बाबाजी राणे आदर्श शिक्षिका उषा कांबळे पत्रकार :- संतोष कांबळे व आदिवासी सेवक :- डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दैनिक नवराष्ट्र नवभारत व विशाल महाराष्ट्राच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले.
Негізгі бет जय महाराष्ट्र पत्रकार संघ मराठी जगत व मैत्री संस्थेच्या वतीने आज हिशोब मेरी शाळा ताडदेव मुंबई
Пікірлер: 1