थंडी यावी आणि हुरडा पार्टी चे नाव कोणी काढले नाही हे तर अशक्यच!!!
जिजाऊ फौंडेशनने यावर्षी हुरडा पार्टी साजरी केली ती वांबोरी येथील सुप्रसिद्ध संकेत फॉर्म्स मध्ये.
गरम गरम हूर्ड्यासोबतच सर्वांनी वेगवेगळ्या अडवेंचर ॲक्टिविटीज चा मनसोक्त आनंद घेतला. थंडी असूनही सगळ्यांनी रेन डान्स केला, आणि विशेष म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असलेल्या ज्येष्ठ मेंबर्स ज्यांना दरवेळी रेन डान्स मध्ये सहभागी होता येत नाही त्यांना यावेळी संकेत फॉर्म्स मधील तलावांमध्ये जलक्रीडा करण्याची संधी मिळाली.
संकेत फॉर्म्स चे सर्वेसर्वा संकेत ओस्तवाल यांनी खूप छान सहकार्य केले. फॅमिली साठी एक दिवसीय सहलीसाठी संकेत फॉर्म्स हे एक उत्तम ऑप्शन आहे. एकदा नक्की भेट द्या.
या हुरडा पार्टी च्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा ग्रुपमध्ये असलेल्या सर्वांचा एक दिवस अविस्मरणीय केला.
#jijaufoundation #jijauhasyayoga
#ahmednagar #hasyayoga #hurdaparty
Негізгі бет #Jijau
Пікірлер