*टाळ वाजे, मृदुंग वाजे ।
वाजे हरीचा विना ||1||
माऊली निघाली पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||2||
जय जय राम कृष्ण हरी
आज शनिवार दिनांक 13/7 /2024 रोजी पंढरपूरच्या आषाढी वारी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रथमता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . गहिणे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करून दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीहरी नामाचा जप करत मार्गस्थ झाली. सदर दिंडी सोहळ्यामध्ये माळवाडीतील ग्रामस्थांनी पालखीचे पूजन केले तसेच दिंडी सावतामाळी मंदिरात विश्रांती घेत असताना भजन , अभंग गायन तसेच महिलांनी फुगड्या खेळून वारीचा आनंद घेतला.
दिंडीस सौ उषाताई आणि सिंधुताई गायकवाड व मालन ताई यांनी अल्पोपहार अर्थात प्रसादाचे वाटप केले. सदर सोहळ्यासाठी *शाळा मुख्याध्यापिका सौ स्नेहा गहिणे मॅडम ,श्री मिलिंद पानंसाडेसर, यांनी नियोजन केले.*सर्व माळवाडी मधील पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमात कृतीयुक्त सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यार्थी आणि पालकांनी माऊली तुकाराम नामाचा गजर करत भजनाचा आनंद लुटत सर्वांनी दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.🚩🚩🌹🌹🚩🚩🚩🚩
Негізгі бет जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी दिंडी सोहळा
Пікірлер: 1