असा होतो कोकणातल्या नद्यांचा जन्म.. कातळ सड्यांवरून वाट काढत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेले हजारो जिवंत प्रवाह असे उंचावरून कोसळतात धबाधबा , एखादे लहान मूल हसत खेळत आईच्या कुशीत जावे तश्या कोकणातल्या दऱ्या खोऱ्यातून वाट काढत सागराच्या कुशीत जाऊन विसावतात,...
सागराच्या कुशीत वाफेच्या रुपात जन्माला आलेली वाऱ्यासोबत प्रेम करून दुर डोंगरांमध्ये निघून जाते पण पावसाच्या रुपात प्रवाह बनून मायेच्या ओढीने खळखळ वाहत ती पुन्हा समुद्राच्या कुशीत विसावते...दरवर्षी पाऊस हे वचन पाळतो , सागराला त्याची नदी परत देतो..
ह्या प्रवासाचां मी साक्षीदार आहे एवढेच काय ते भाग्य....ह्या थेंबांत ह्या पाण्यात मला माझे अस्तित्व दिसते .... सृष्टीचा हा सोहळा पाहायला मी पावसात सह्याद्री चढतो आणि प्रवाहा सोबत खेळताना मी पाऊस होतो..
••रानमाणूस••
Негізгі бет जिथे सागरा नदी मिळते | अनोखा संगम Where River Meets the Sea
Пікірлер: 378