कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला देवगड तालुका मालवण तालुक्याप्रमाणेच निसर्गरम्य तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. विजयदुर्ग बीच देवगड बीच, तारामुंबरी बीच कुणकेश्वर बीच तांबळडेग बीच अशा निसर्गरम्य किनारपट्टी लाभलेल्या देवगड तालुक्याचे आठवड्याचे बाजारही तेवढेच आकर्षक आहेत. देवगड बाजार, तळेबाजार,शिरगाव बाजार, मिठबाव बाजार, त्याचप्रमाणे वाडा पडेल चा बाजार हे आठवडी बाजार शेतकऱ्यांना एक पर्वनीच असतात. शेतात पिकवलेल्या फळभाज्या पालेभाज्या कष्टकरी लोक या बाजारात विकायला आणतात. विक्रीतूनच कुटुंबाचा उदाहरण निर्वाह होतो. चतुर्थीच्या दिवसात वाडा पडेल च्या बाजारात बरेच कष्टकरी आप आपले उत्पादन घेऊन या बाजारात आले होते. चाकरमानी व कष्टकऱ्यांनी सजलेला हा बाजार खूपच सुंदर होता.
वाड्यापासून जवळ असलेलं विमलेश्वर हे पांडवकालीन मंदिरही निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. कातळात कोरलेली लेणी त्याचप्रमाणे मंदिराच्या समोर असलेला बारामाही वाहणारा निर्मळ झरा त्याचप्रमाणे जांबा दगडाचा पूल आणि आजूबाजूचं निसर्गरम्य असा सुंदर देखावा आपणास पहावयास मिळतो.
देवगड वाडा पडेल कॅन्टींग चा हा बाजराचा व्हिडिओ त्याचप्रमाणे विमलेश्वर मंदिर पहावयास आपणास नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे आपले चॅनेल सबस्क्राईब करावे ही विनंती🙏धन्यवाद🚩 जय हिंद 🇮🇳
Негізгі бет कोकण🌴गणपती उत्सवातलो देवगड वाडा पडेल कॅन्टीनचो चतुर्थीचो बाजार कसो भरलो?पांडवकालीन मंदिर विम्लेश्वर
Пікірлер: 35