#BolBhidu #MunjyaMovie #MunjyaReview
चेटकीण, हडळ, खवीस आपल्याकडं भूताच्या गोष्टींमध्ये वर्षानुवर्ष या कॅरॅक्टर्सनी मोठं मार्केट खाल्लंय. स्टोरीचा प्लॉट कुठलाही असू द्या, या कॅरॅक्टर्सशिवाय आपल्याकडं भूताची स्टोरी पूर्णच होत नाही. पण यांच्यापेक्षा थोडासा अंडररेटेड असला तरी भूताच्या गोष्टींमध्ये भाव खाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मुंजा. डोक्यावर टक्कल, हडकुळं शरीर, खोल पण वटारलेले डोळे आणि पिंपळाच्या झाडावरचा मुक्काम, मुंजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हीच इमेज येते. आजपर्यंत भूताच्या गोष्टींमधला हा मुंजा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय.
७ जूनला रिलीज झालेल्या मुंज्यानं बॉक्स ऑफिसवर फक्त दहा दिवसांत ५० कोटींपेक्षा जास्तचा गल्ला कमावलाय. कोणतीही तगडी स्टारकास्ट नसताना, मीडियात प्रमोशनचा मोठा गाजावाजा झालेला नसताना मुंजाचं हे यश खूपच मोठं आहे. त्यामुळं सध्या मुंजाची सगळीकडंच चर्चा होतेय. पण गावाकडच्या गोष्टींमधला मुंजा सिनेमात एवढा हीट होण्याची कारणं काय, कालपर्यंत ज्याची भीती वाटायची त्या मुंजाची सध्या एवढी क्रेझ का वाढलीय, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет कोकणाच्या मातीतल्या Munjya चा Box Office वर धुमाकूळ, फक्त १० दिवसांत ५० कोटींचं कलेक्शन कसं कमवलं ?
Пікірлер: 495