मुंबई महानगरपालिकेतील मतदार संघ भूमिपुत्र कोळी जमातीसाठी राखून ठेवावे
मुंबादेवीच्या सामूहिक दर्शनाच्या वेळी रमेश दादा पाटील यांनी केली मागणी
मुंबई रविवारी दि. ६ ऑक्टोंबर
मुंबई ही मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी जमातीची आहे मुंबईतील कोळी समाजाने स्वतःची सर्व उपजीविकेचे नैसर्गिक संसाधने मुंबईच्या विकासासाठी अर्पित केली आहेत . उपऱ्यांच्या अरेरावीत स्वार्थीपणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये भूमिपुत्रांना सातत्याने डावळल गेले आहेत म्हणूनच आज त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मूळ भूमिपुत्रांना निर्णय प्रक्रियेतत सहभागी करून घेणं हे बंधनकारक आहे आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील कोळीवाडे निहाय मतदार संघ हे भूमिपुत्र कोळी जमातीसाठी राखून ठेवावे अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार रमेश दादा पाटील यांनी केली.
आज मुंबईतील मूळ भूमिपुत्र असणाऱ्या कोळी समाजाचे कुलदैवत आणि मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या श्रीमुंबा आई देवस्थानावरील आपला पूर्वापार हक्क आणि अधिकार शाबूत ठेवण्यासाठी कोळी समाजाने आज मोठ्या उत्साहाने सामूहिक दर्शन घेतले त्या प्रसंगी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी आई मुंबादेवी चा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली .
मुंबईमध्ये 27 कोलीवाडे शिल्लक राहिले असून प्रत्येक कोळीवाडे निहाय मतदार संघ महानगरपालिकेने कोळी समाजासाठी राखून ठेवावेत अशी त्यांनी पुढे मागणी केली .
याप्रसंगी लक्ष्मीनारायण मंदिर येथून कोळी समाजाची मोठी मिरवणूक मुंबादेवी दर्शनासाठी आली होती यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस टपके भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष एडवोकेट चेतन पाटील कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर प्राध्यापक अभय पाटील अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष केदार लखेपुरिया माजी नगरसेविका रजनी ताई केणी कोळी समाजाची अभ्यासक भगवान नामदेव भानजी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Негізгі бет कोळी महासंघ, चला मुंबादेवीच्या दर्शनाला 2024, आई मुंबादेवी आम्हा कोळ्याची
Пікірлер