करंजी सारण रेसिपी / करंजी बाकर रेसिपी
दिवाळी फराळातील सर्वांच्याच आवडीचा प्रकार म्हणजे करंजी, करंजी ला लक्ष्मी पूजन दिवशी खूप महत्व आहे. याचा नेवैद्य लक्ष्मी ला दाखवला जातो. कारण करंजी हा गर्भाचा पदार्थ म्हणुन ओळखला जातो, तसेच करंजी ला गौरी पूजेच्या वेळी महत्वपूर्ण स्थान आहे. गर्भाचा पदार्थ म्हणुन करंजी ला गौराईच्या पोटात ठेवण्याची प्रथा बर्याच ठिकाणी आहे.
ईथे आपण करंजी बनविताना जे सारण बनवतो त्याचे 3 प्रकार पाहणार आहोत. या विडियो मध्ये मी काही टिप्स शेअर केल्या आहेत, त्या जरूर पहा. तसेच हे तिन्ही सारणाचे प्रकार खुप खमंग, खुसखुशीत लागतात त्याच बरोबर करंजी जिभेवर ठेवताच विरघळतात. असं सांगितलेले प्रमाण आणि पद्धत वापरून बनवलेले सारण हमखास खुसखुशीत होते. या तीन सारणा पैकी दोन प्रकार साखर वापरून बनवले आहेत आणि एक प्रकार गुळ वापरून बनवले आहेत.
हे तीनही सारणाचे प्रकार बरेच दिवस साधारण 20-30 दिवस हवाबंद डब्यात टिकतात. तुम्हाला जे आवडेल ते सारण वापरून तुम्ही रवा किंवा मैदा दोन्ही वापरून कोणत्याही प्रकारची करंजी बनवू शकता.
सारणाचे 3 प्रकार ( खालील साहित्य वाटी / कप च्या मापा ने घेतले आहे, तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर त्याप्रमाणे साहित्य वाढवावे)
साहित्य -
1) सुके खोबरे आणि साखरेचे सारण -
सुके खोबरे 1 cup
पिठी साखर 2.5 cup
खसखस 2-3 tbsp
सुक्या मेव्याचे काप
साजूक तूप 2 tbsp
वेलची पावडर 1/4 tsp
2) गूळाचे सारण
पांढरे तिळ 200gms / 1 cup
बारीक चिरलेला गूळ 200gms / 1 cup
सुके खोबरे 100gms / 1 cup
खसखस 2-3 tbsp
वेलची पावडर 1/4 tsp
3) गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे सारण
गव्हाचे पीठ 1/2 cup
बारीक रवा 1/2 cup
सुके खोबरे 1 cup
खसखस 2-3 tbsp
पिठी साखर 2.5 cup
सुक्या मेव्याचे काप
साजूक तूप 2-3 tbsp
वेलची पावडर 1/4 tsp
#करंजीसारण #karanjisaran #karanjistuffing #karanji
#bakar #diwalifaral #diwalispecial #दिवाळीस्पेशल #दिवाळीफराळ #saritakitchen
Негізгі бет करंजी सारणाचे 3 प्रकार खुसखुशीत खमंग, महिनाभर टिकणारे। Karanji saran। करंजी साठी बाकर 3 प्रकार
Пікірлер: 76