खान्देश स्पेशल पारंपरिक दराबा लाडू
जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाजामध्ये हे पारंपारिक लाडू खूप प्रसिद्ध आहेत . लग्नकार्यात सुद्धा या लाडूंची देवाण घेवाण होते. अतिशय चविष्ट , आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक असतात हे लाडू .
साहित्य - दोन किलो गहू , निघालेल्या सपिटीमधील एक किलो सपिटी (सोजी), तूप अर्धा ते पाऊण किलो, पिठीसाखर पाऊण किलो, वेलची व जायफळ पूड
कृती -
प्रथम दोन किलो गहू घेतले.
ते पाच ते सात मिनिटे पाण्यात भिजवले.
नंतर चाळणीत निथळून घेतले.
आता हे गहू आपल्याला रात्रभर एका स्वच्छ पांढर्या कापडात बांधून ठेवायचे आहेत.
दुसर्या दिवशी सकाळी गिरणीतून दळून आणायचे आहे. पण गिरणीवाल्याला सांगायचे सोजी चे दळायचे आहे असे.
दळून आणल्यानंतर सपीटीच्या चाळणीतून चाळून घ्यायचे. सपीटी चाळून झाली की थोड्या जाड चाळणीने चाळून घेतले की रवा निघतो व बाकीचे राहते ते गव्हाच्या दळणात दळून आणायचे. आपल्याला पाहिजे तेवढी सपिटी वापरावी व बाकीची फ्रीज मध्ये ठेवावी. छान राहते. लाडू पण दोन महिने टिकतात.
प्रथम थोडे तूप कढईमध्ये घेऊन मंद आचेवर सपिटी अर्धा तास तरी भाजून घेणे म्हणजे तूप सुटेपर्यंत. मिश्रण सतत हलवत राहणे. मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यात वेलची पूड व पिठीसाखर एकजीव करावे. मग लाडू बांधावे. तूप जास्त घेतले तर लाडू न बांधता मिश्रण डब्यात ठेवले तरी चालते. ते चमच्याने घेऊन खाल्ले तरी चालते. तूप कमी असेल तर लाडू बांधता येतात.
------------------------------------------
The origin of the name Daraba has several theories. Some say that it was served in the Mughal court of Burhanpur and from ‘darbar’, the name ‘daraba’ was derived. Another theory is that ‘daraba’ is an off-hand term which refers to a pasty edible item, which is actually the texture of this product. A third theory is that in Kutchi language, ‘daraba’ means roasted - which is a part of the elaborate process to make this product, and hence the name. We like to believe that all 3 theories are legitimate as they all make sense! But we are also sure that this ladoo by any other name would taste as divine. Our insistence on using top quality ingredients and no-compromise ideals make sure that you get the most authentic flavors on your palate. Made of only four ingredients (wheat, desi ghee, sugar and cardamom), this ladoo is sure to steal your heart with its melt-in-mouth texture and subtle flavours. We also hear heart-warming stories from our patrons where their kids won’t settle for anything else! This ladoo is supposed to be pasty in nature. So don’t be alarmed if they are out of shape. A pasty ladoo is a sign of great quality.
Thank you for watching :)
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль खान्देश स्पेशल पारंपरिक दराबा लाडू | Khandesh Special Daraba Ladoo | Indian Sweet | Traditional
Пікірлер: 4