खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आपण आज पाहणार आहोत,
शर्यत क्षेत्रातील जातिवंत बैल घडवण्याचे खरे काम हे खिल्लार पालक करत असतात. शर्यतीसाठी लागणारी खोंड बाजारातून अचूक निवडून घेणे, म्हणजे आपला संपूर्ण अनुभव पणाला लावल्यासारखे आहे. आज आपण पाहत असलेली शर्यत क्षेत्रातील नामवंत बैल हे त्याच्या मालकांनी त्यांची योग्य निवड करूनच त्यांची खरेदी केलेली असते.
योग्य निवड करताना मालक एवढ्या सर्व खोंडांमधून चपळ, चाणाक्ष, नजर सैरभैर, एखाद्या छोट्याश्या आवाजाने देखील आपले कान उभे करून इकडे तिकडे पाहणे, तिथे त्याला चालवून, पळवून पाहणे या सर्व बाबी एक खिल्लार पालक, शर्यत शौकीन पाहूनचं खोंड घेत असतात.
मान उभी करून सतत इकडे तिकडे पाहून हरणासारखा कानोसा घेणे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, कि ज्या शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
बरयाच खिल्लार पालकांचे म्हणणे असते कि आम्हाला शर्यतीसाठी खोंड घ्य्याचा आहे तर तो कसा निवडून घेतला पाहिजे. यावर एकच आम्ही सांगू शकतो कि, महाराष्ट्रामध्ये भरण्याऱ्या सर्व खिल्लार बाजार, यात्रा फिरल्या पाहिजेत. तसेच महाराष्ट्रमध्ये ज्याच्या दावणीला नामवंत खोंड, बैल आहेत किंवा होऊन गेले अशा नामवंत खिल्लार पालकांना जाऊन भेटणे त्याच्याशी चर्चा करणे, खूप गरजेचे आहे. या सर्व माध्यमातून तुम्हाला अनुभव चांगला मिळेल, व जातिवंत खोंड निवडणे शक्य होईल.
महाराष्ट्रामध्ये कार्तिक वारीचा बाजार झाल्यानंतर श्वास घ्यायला देखील वेळ मिळणार नाही, एवढ्या प्रमाणात यात्रा या दर १० दिवसाला भरत असतात. या सर्व यात्रा आपण सर्वांनी फिरणे गरजेचे आहे. हाच एकमेव पर्याय असून. जर तुम्ही या सर्व यात्रा फिरला तर तुम्हाला वेगवेगळ्या स्वभावाचे खिल्लार खोंड पाहता येतील, यातून तुमचा अनुभव नक्कीच दांडगा होईल. अनोळखी खिल्लार पालकांना भेटणं होईल, यातून ओळख वाढेल, व भविष्यात खिल्लार क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर पोचायला वेळ लागणार नाही.
Негізгі бет Үй жануарлары мен аңдар Khillar Maharashtrachi Shaan । शर्यतीची खोंड कसे निवडले जातात ? । भाग ४ । Khillar । २०२०
Пікірлер: 39