कोयतोरियन संस्कृती आदिजन संस्कृती असून ती सिंधू सभ्यता आणि धर्म संप्रदायांपूर्वीची संस्कृती आहे. ही संस्कृती निसर्ग पूजक, संरक्षक व संवर्धक असून कोया पूनेम अर्थात मानवाला सत्य मार्गावर चालण्याचे शिक्षण देणारी आहे. गोटूल ही या संस्कृतीची ज्ञान वितरणाची व्यवस्था म्हणजेच विद्यापीठ आहे. यातून निर्मित कोया अथवा कोयतोर म्हणजेच माणूस मागास नसून तो ज्ञान विज्ञानाने समृध्द असल्याचे प्रतिपादन कोया पूनेम संवैधानिक कार्यशाळेच्या प्रशिक्षकांकडून करण्यात आले. संपूर्ण जगाला शांतीचे धडे देणारा मार्ग ज्यात संपूर्ण मानव समुहाची काळजी घेतली गेली आहे अशा आदिजन संस्कृतीचे धडे गिरवण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज असल्याचे प्रतिपादन कोया पूनेम शोध संगत आणि प्रशिक्षण संस्थेचे संरक्षक तिरूमल हिडको मनीष यांनी केले.

विश्वशांतीचे वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पेनकडा, पेनमंडानी निर्माण केलेले नैसर्गिक तत्वाचे अभिमतानुसार कोयापूनेम संवैधानिक प्रशिक्षण कार्यशाळेचे तीन दिवसीय आयोजन गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे सुरू आहे. महाराष्ट्रातील हे पहीलेच आयोजन असून या कार्यशाळेत महाराष्ट्र आणि छत्तीसगड मधील ५०० तरूण, तरूणी व प्रौढ नागरिकांनी पूर्णवेळ सहभाग घेतला असून दररोज दीड ते दोन हजार नागरिक अर्धवेळ उपस्थित राहून सकाळी ६ ते रात्रो १०.३० वाजतापर्यंत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने सर्व प्रशिक्षणार्थी हे ज्ञानाचे धडे गिरवित आहेत.
पारंपारिक पेनमंडा, पेनकडा च्या माध्यमातून आदिजन व्यवस्था ही नैसर्गिक व्यवस्था असून तिचे स्वरूप जनकल्याणकारी आहे. इथे शोषण, भ्रष्टाचार, भौतिकता वादाला जागा नाही. निसर्गाच्या सानिध्यात राहून जे पक्व आहे, जे घेण्यायोग्य आहे आणि जेवढे आवश्यक आहे तेवढेच घेणे ही आदिजन व्यवस्थेची वैश्विक शिकवण जग विसरत चालला असून ती शिकवण पून्हा प्रस्थापित करण्यासाठी आदिजनसमूहाला वास्तविकतेचे धडे देणे, प्रशिक्षीत करणे यासाठी हे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असल्याचे आयोजकांनी सांगितले. हे प्रशिक्षीत युवक आपापल्या क्षेत्रात जाऊन स्थानिकांना आदिजन व्यवस्थेचे महत्व पटवून देऊन त्याचा अंगिकार करण्याचे आवाहन करीत विश्वशांतीचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करतील, असेही ते म्हणाले.

विश्व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कोयतोरियन संस्कृती मध्ये निहीत विशिष्ट व्यवस्था ज्यात बिडद अर्थात समूह, नाती-गोती, गोत्र प्रणालीस पूर्वजांच्या अपेक्षेनुसार पूर्नस्थापित करणे आणि वैश्विक आदीजन समुहाला एका झेंड्याखाली एकत्रित करणे ही तीन बिंदूची विचार नीती असून पाच सिध्दांत आणि सात पॅनलवर कोया पूनेम शोध संगत कार्य करते. सदर कार्यशाळेत हिडको मनीष, हुर्रा महेश, नैताम लोचन, मरकाम सुरेश, पटाव सुगडू यांचे सह अनेक प्रशिक्षकांचा समोवश आहे. सोमवारी कार्यशाळेचे समापन होईल.
Негізгі бет KOYA PUNEM WORKSHOP DHANORA 2021 / कोयापुनेम कार्यशाला 2021
Пікірлер: 5