नमस्कार मित्रांनो,
ग्रामीण Diaries या आमच्या KZitem चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.
_______________________________________
Vlog- 01 - कुकडीखापा वॉटरफॉल
Vlogging at Kukdikhapa Waterfall Chindwara
कुकडीखापा वॉटरफॉल हे ठिकाण नागपूर -छिंदवाडा हायवे वर असून, नागपूर पासून 120 किमी अंतरावर आहे. मध्य प्रदेश येथील छिंदवाडा च्या 60 किमी आधी कुकडीखापा नावाचे एक गाव असून या ठिकाणी हा नयनरम्य वॉटरफॉल आहे.
कुकडीखापा हे गाव हायवे पासून 08 किमी अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाहनानेच जावं लागेल, गावापर्यंत जाण्यासाठी इतर कोणतीही दुसरी व्यवस्था नाही. येथे 2 व्हीलर, 4 व्हीलर, बस अशे सर्वच प्रकारचे वाहन जाऊ शकतात.
रस्ता इतका बरा नाही.पण गावापर्यंत व्यवस्थित जाऊ शकता. इथले काम अद्याप सुरूच आहे.
येथे आपल्याला छोटे दुकानें मिळतील, जसं चिवडा, मक्का आणि इतर पदार्थ. इथे पार्किंग ची सुविधा सुद्धा आहे.गार्ड सुद्धा राहतात.सद्या इथले काम सुरु असल्यामुळे वर्दळ सुरूच असते.
येथे आपण जून महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत येऊ शकता, बाकी वेळ येथे धबधब्याला पाणी राहत नाही.पावसाळ्यात थोडं सावधानी घेण्याची आवश्यकता असते.
दोन टप्प्यात पडणाऱ्या धबधब्या सोबतचं येथे खाली उतरण्यासाठी ट्रेकिंग सुद्धा करता येतं. ही जागा निसर्गाच्या सानिध्यात दूर असल्यामुळे जंगली प्राण्यांची सुद्धा भीती असते. पण येथे भरपूर लोकं येत असतात. पार्टी करण्यासाठी किव्वा फॅमिली ट्रिप पण येतात.
येथे लहान मुलांना आणतांना थोडी काळजी घ्यावी. फोटो काढतांना पाण्याच्या जास्त जवळ जाऊ नये.लहान मुलांना घेऊन खाली जाऊ नये.
कुकडीखापा वॉटरफॉल हे सातपुडा च्या कुशीत समावलेलं निसर्गातील एक नयनरम्य असं ठिकाण आहे. याठिकाणी आपण निसर्गाची सुप्त अशी सुंदर रचना अनुभवू शकता. इथे आल्यानंतर मन नक्कीच भारावून येते. एकदा तरी येथे भेट द्यायलाचं पाहिजे.
येथे येतांना निसर्गाला कसल्याही प्रकारची हानी करू नका, येथे कचरा टाकू नका. स्वछता ठेवा.
आणखी काही प्रश्न असल्यास आम्हाला विचारू शकता.
त्यासाठी खाली कमेंट करा. किव्वा ई-मेल सुद्धा करू शकता.
Location - (लोकेशन)
Kukdi khapa Water Fall, Madhya Pradesh 480106
maps.app.goo.gl/j1k7v6tUo6QZN...
-------------------------------------------------------------------
Our other Social media Links
Instagram - instagram.com/invites/con...
Facebook - / gramindiaries
Contact - gramindiaries@gmail.com
----------------------------------------------------------------
Please Like, Share & Subscribe for more Videos.👍
Also Follow Chindwara Artist On Instagram, link below. A Big thank you for Chinwara Artist Team.
instagram.com/chhindwara_arti...
#GraminDiaries
#Kukdikhapa_Waterfall #Nagpur #Chindwada #GraminDiaries
Негізгі бет Kukdikhapa Waterfall - Vlog 01- Beautiful Place|| Near Nagpur ||Must Visit.
Пікірлер: 54