अभिषेक करण्यासाठी लागणार आहे साहित्य
फुलं, हळदीकुंकू ,तांब्याचे ताट ,अक्षदा ,खडीसाखर ,पाठ, नवीन कोरा कपडा, दही ,दूध, तूप ,साखर, मध ,याचं पंचामृत, खडीसाखरेचा प्रसाद ,तुपाचा दिवा, अगरबत्ती
व्हिडिओ मी आपण घरच्या घरी आपल्या कुळदेवतेचा अभिषेक कशाप्रकारे करू शकतो यासाठी बनवलेला आहे अशा प्रकारे अभिषेक केल्यामुळे आपल्यावर आपल्या देवीची कृपा होऊन आपल्या घरात प्रसन्नता राहते आपल्या घरातील वातावरण आनंदमय राहते व आपल्या देवीचे आशीर्वाद आपल्यावर राहतात आपल्याला आपल्या कुलदेवतेला काही कारणास्तव जायला जमत नसेल तर आपण अशा प्रकारे घरच्या घरी देवीचा अभिषेक करून तिला प्रसन्न करून घेऊ शकतो🌺🙏🏻
🌺🌺हा अभिषेक करण्यासाठी तांब्याच्या ताटामध्ये देवीचा टाक घेऊन त्यावर प्रथम हळदीकुंकू लावून अक्षदा खडीसाखर व फुल व्हायचे आहे त्यानंतर पंचामृताने देवाला स्नान घालायचे आहे त्यानंतर कोमट पाण्याने पुन्हा मंत्र म्हणत देवाला स्नान घालून अशाप्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर नवीन कोरा कपडा घेऊन त्यावर देवाचा टाक स्वच्छ पुसून ठेवायचा आहे त्यावर हळदीकुंकू फुल घरात जो आपण गोड बनवलेला असेल तो प्रसाद किंवा खडीसाखर असा प्रसाद देवाला ठेवायचा आहे व देवाचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर आरती करून घ्यायची आहे.🌺🌺🙏🏻
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद 🌺🌺🙏🏻
Негізгі бет कुलदेवतेचा अभिषेक घरच्या घरी कसा करावा🌺 🌺आपल्यावर तिची कृपा राहावी🌺🌺 kuldevtecha abhishek🌺🙏🏻🙏🏻 🙏🏻
Пікірлер: 12