#pune #maharashtra #govtofmaharashtra #baramati #agriculture #ajitpawar #sharadpawar #supriyasulefc #baramati #haribhaukhade #beed #jijaumultistatpatsanstha #corruptsystem #beedpolice #beedpoliceraid #anticorrupción #acbbeed
आता एक कोटीची लाच मागतो; म्हणजे तो इन्स्पेक्टर काय हलका असेल का? बीडच्या पोलीस निरीक्षकाकडे एक कोटींची रोकड; एक किलो सोनं, पाच किलो चांदी असं मोठं घबाड आढळलं..!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या एका कारवाईने राज्याचे लक्ष वेधून घेतले असून राज्यात सर्वत्र सध्या त्याचीच चर्चा आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे! या खाडेच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेले घबाड डोळे विस्फारून टाकणारे आहे. अर्थात हे फक्त रोकड आहे. खाडेच्या नावावर जमिनीची कागदपत्रे आहेत, ती वेगळीच..!
या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी होता हरिभाऊ खाडे आणि त्याचा सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर! हे दोघेही फरार असून
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीत हरिभाऊ खाडे याच्या घरातून एसीबीच्या पथकाने एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड, 970 ग्राम सोने आणि पाच किलो चांदी जप्त केली आहे. बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये झालेल्या कथित 100 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणातून हे लाचखोरीचे प्रकरण पुढे आले होते.
जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी बबन शिंदे आणि बँकेची अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल होते. यातील बबन शिंदे यांनी दोन व्यवसायिकांना बांधकामाचे साहित्य पोटी साठ लाख रुपये दिले होते त्यामुळे हे दोन व्यावसायिकही या गुन्ह्यात सहभागी करण्यात आले होते त्यांची आणि वरील चौघांची चौकशी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होती.
त्यामध्ये हरिभाऊ खाडे याने दोघांकडे प्रत्येकी 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. दोघांकडे 50 लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर अखेर 30 लाख रुपये तडजोड झाली. मात्र खाडे हा खूप त्रास देत असल्याने अखेर या दोघांनी खाडेच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाच लचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भातील पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तडजोडीत ठरलेल्या 30 लाखांपैकी पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता तक्रारदार व्यावसायिक हा पोलीस निरीक्षक खाडे यास देण्यासाठी गेला असता खाडे याने आपण कामकाजासाठी बाहेर आलो असून हे पाच लाख रुपये खाजगी व्यावसायिक खुशाल जैन याच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान व्यवसायिकांकडून हा हप्ता खुशाल जैन स्वीकारत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र त्यानंतर लागलीच खाडे व जाधवर हे दोघेही फरार झाले. त्यानंतर खाडे याच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा हे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले.
Негізгі бет लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेचं इंदापूर, बारामती कनेक्शन!बीडचं १०० कोटी घोटाळा प्रकरण!
Пікірлер: 1