रामदास बोट, सावित्री नदी दुर्घटना,दिडदिवसाची गवराय, आणि ये र बंधवा माझे डोंगुराला ह्या गीतांच्या लोकप्रियते नंतर मेघास्वर घेऊन येत आहे एक लगीन गीत" लारुकी पोर माझी चंद्राची कोर" खास लग्नसराई साठी. गीत- सुरेश म्हात्रे, गायक- किसन नाना फुलोरे आणि सोनाली भोईर, संगीत आणि संगीत संयोजन- अमित फ़ुलोरे
/ sureshmhatre.geetkar
लारुकी पोर माझी चंद्राची कोर.तुझे लग्नाचा इचार मनात आयला...
सांग पोरी सांग या बापासला,कैसा नवरा नवरा पाहिजे सांग तुला...
मोटारवाला नको पैसेवाला,नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला...
तुझे साठी बाय गो चप्पल झिजवीन पोरी दिलवाला नवरा शोधीन तुला...
बंगलेवाला नको गार्डनवाला, जिव लावणारा नवरा पाहिजे मला...
तुझेसाठी बाय उपाशी फिरीन,जिवलावणारा नवरा शोधीन तुला.....
लारुकी पोर माझी ..........
बेवडा नको तोंडी गुटका नको, निर्व्यसनी नवरा पाहिजे मला........
तुझेसाठी बाय उन्हान गो फिरीन.निर्व्यसनी नवरा शोधीन तुला.........
बाथरूम घरान संडास मंगले दारान ऐसे घरान दे र बाबा मला.....
तुझे साठी बाय गो दुनिया फिरीन पोरी मनासारखा नवरा शोधीन तुला.........
लारुकी पोर माझी.......
सुरेश म्हात्रे
Негізгі бет Laruki Por | Motarwala Nako Paisewala | Dilwala Nawra Pahije | Sonali Bhoir | Song 2022
Пікірлер: 451