माननीय आमदार श्री. रोहित पवार | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई
माननीय आमदार श्री. रोहित पवार यांनी विधानसभेतील अंतरीम अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. लोकसभेचे निकाल पाहून धोरण करणारे घाबरलेले आहेत, त्या भीतीतून हा अर्थसंकल्प पुढे आला आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. मुलींना मोफत शिक्षण देण्याची जी योजना आहे त्यात कुठल्याही अटी न टाकता सामान्य कुटुंबातील मुलींना त्याचा लाभ देण्यात यावा,अशी विनंतीदेखील त्यांनी यावेळी केली.
रोहित पवार पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी कमी पैशांची तरतूद करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने बहिणींना व आईला आनंद द्यायचा असेल तर त्यांच्या मुलाला, पतीला व भावाला रोजगार देण्याची आवश्यकता आहे. माझ्या मतदारसंघात एमआयडीसी व्हावी अशी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची इच्छा आहे त्यांच्या आनंदाबद्दल सरकारने विचार करावा, अशी विनंतीदेखील यावेळी रोहित पवार यांनी शासनाला केली.
#MonsoonSession2024 #MonsoonSession #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #rohitpawar
Негізгі бет माननीय आमदार श्री. रोहित पवार | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई
Пікірлер