#BolBhidu #babandadashinde #sharadpawar
बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे आणि रमेश शिंदे हे तीन सख्ये भाऊ. महाराष्ट्रातल्या एका तालुक्यातल्या एका गावात हे तीन भाऊ एका व्यासपीठावर आले. या तिघांनी एका हारात एकत्र फोटो काढले आणि ही राज्यपातळीवरची बातमी झाली. कारण यातले दोन भाऊ आमदार. तर तिसऱ्या भावाने गेली 15 वर्ष आपल्या सख्या भावाच्या घराची पायरी चढली नव्हती. यावेळी या भावाचाच मुलगा विरोधात उभा राहिलं अस वातावरण होतं. पण नेहमीप्रमाणे बबनदादा शिंदे नावाचा माणूस मैदानात उतरला आणि 15 वर्षाच्या वजाबाक्या एका बेरजेत रिकाम्या केल्या. माढा लोकसभा जसा पवार फडणवीसांच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रात गाजतो तसाच माढा विधानसभा देखील गाजतो.
मात्र माढा विधानसभेत फक्त आणि फक्त बबनदादा शिंदेंच वातावरण असतं. दरवेळी यावेळी दादांना पाडणार म्हणत विरोधक कंबर कसतात, राजकारण घडतं, राज्यातल्या कलाप्रमाणे वाऱ्यावर स्वार होवून आमदारकी मिळेल असे अंदाज लावले जातात पण जेव्हा निकाल लागतो तेव्हा विरोधकांचे डावपेच पाण्यात जातात, कारण बबनदादांनी पाण्यावरच डाव मारलेला असतो. गेली 6 टर्म बबनदादा शिंदे माढ्यातून निवडून येत आहेत. पण यावेळी माढ्याचं वातावरण नेमकं कसं आहे? यावेळी बबनदादांच्या ऐवजी त्यांचा मुलगा रणजीत उभारणार आहे, जे यश बबनदादांना मिळायचं तेच त्यांच्या मुलाला मिळेल का? की यावेळेची राजकीय समीकरणं उलटी पडतील? इथून शरद पवार कोणाच्या खांद्यावर आपला हात टाकतील समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Madha Vidhansabha : माढ्यात Sharad pawar यांना बबनदादा शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही ?
Пікірлер: 244