नॉनस्टोप गौरी गणपती सॉंग्स -घागर गुमु दे
मंगळागौरी व्रत पूजा उद्यापन / Manglagauri Vrat Pooja Vidhi / Shravan Pooja / mangala gauri marathi
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
Enjoy the video!
मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्री ने करण्याचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्षे हे व्रत करण्यात येते. यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडशोपचाराने पूजा करण्यात येते. मंगळागौर अर्थात पार्वती. शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते. पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते. यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा (कहाणी) भटजींकडून ऐकतात. त्यानंतर पंचपक्वान्नांचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची प्रथा आहे. पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेकविधी गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात. यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते. आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो. त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करण्यात येते. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की या मंगळागौरीचे पूजा विधी कसे असतात. तर त्याचीही खास माहिती (mangala gauri information in marathi) आम्ही तुम्हाला इथे देत आहोत.
मित्रांनो, ह्या विडिओ मध्ये आपण मंगळा गौरी व्रताचे महत्व साहित्य पूजाविधी उद्यापन याची माहिती सांगितली सांगितली आहे मंगळागौरी हे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते म्हणून त्यास मंगळागौरी असे म्हटले जाते.
मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात. सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते.
सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती (सहसा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) पूजेसाठी मांडण्यात येते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही पुजायला ठेवण्यात येते
त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवाची षोडषोपचाराने पूजा करतात. त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरतीही (mangla gauri aarti) करण्यात येते
आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सवाष्णींना भोजन वाढून त्यांना वाण देण्यात येते
श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो. या पूजेच्यावेळी शक्तीतत्वाची आराधना करण्यात येते
माता, बुद्धी, विद्या आणि शक्तीरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते
‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठीही नवविवाहिता प्रार्थना करते
लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते. जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो. मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते. कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा ही शिकवण देण्यात येते
हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजींच्या हातून मोठी पूजा करून करायचे असते
तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते
marathi.popxo....
Негізгі бет महाराष्ट्रीयन मंगलागौरीचे पारंपरिक खेळ मराठी गाणी - भाग 1
Пікірлер: 6