#KolhapurFlood #MaharashtraRains #KonkanFloods #ChiplunFlood
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणाची दैनी उडवलीय. विशेषतः कोल्हापूर, चिपळूण, महाड, सांगली या भागात मोठं नुकसान झालंय. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात पाणी शिरलंय. पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने पुणे - बंगळुरू महामार्गाची वाहतूक बंद झालीय. कोयना धरणाचे दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्गही सुरू झालाय. पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद केली आहे. गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट याठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत. तर, सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीने 40 फूट ही इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहरातल्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णेची पाणी पातळी वाढण्याचा अंदाज आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरलंय. वाढती पातळी लक्षात घेऊन पूर पट्ट्यातील शेकडो कुटुंबांनी स्थलांतर सुरू केलंय. वारणा नदीलाही पूर आला आहे. वारणा नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफला पाचारण केलं आहे.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Kolhapur Sangli Flood : Heavy Rain मुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये झालीय पूरस्थिती
Пікірлер: 63