#BolBhidu #AjitPawarNCP #MahayutiSeatSharing
अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून महायुतीत 'ऑल इज नॉट वेल' अशी स्थिती असल्याचं बोललं जातं. भाजप आणि शिंदे गटासोबत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सातत्यानं खटके उडताना दिसतात. आता जागावाटपावरून देखील त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतंय. तिन्ही पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर येत असतानाच, आता अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह आखण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येतायंत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न केलं जात असल्याची चर्चा आहे.
यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सूचक विधान केलंय. अजित पवारांची गरज संपल्यानं भाजपकडून त्यांचा काटा काढला जातोय. अजित पवार यांना बाहेर काढलं तर भाजप आणि शिंदे गटाला जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय. पण अजित पवारांना महायुतीबाहेर काढण्याची खेळी खरंच भाजप आणि शिंदे गटाकडून केली जातेय का? नेमक्या चर्चा काय होतायंत? अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली तर कुणाला फटका बसेल? पुढे अजित पवारांचं राजकारण कसं असू शकतं? सगळ्याचं प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Mahayuti मध्ये Ajit Pawar यांच्या NCP ला बाहेर काढण्याचा BJP आणि Eknath Shinde गटाचा प्लॅन ?
Пікірлер: 95