#ManojJarange #ManojJarangeSpeech #NarayangadSabha
#dasaremelava2024 #vidhansabhaelection2024 #marathareservation
नारायण गडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा पार पडतोय.नारायण गडावरील मनोज जरांगे पाटलांच्या मेळाव्यास तुफान गर्दी झालीय. मनोज जरांगे पाटलांच्या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून हजारो मराठा कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर दाखल झालेत.नारायण गडावर भगवे झेंडे घेऊन मराठा तरुणांनी मराठा आरक्षणावरुन तुफान घोषणाबाजी सुरु केलीय. विधानसभेआधी मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यातून मोठं शक्तिप्रदर्शन केलंय. तर दुसरीकडे सावरगाव घाटामध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडतोय. या मेळाव्यात धनंजय मुंडेंही सहभागी झालेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे मुंडे बंधू भगिनीसह सरकारवर काय बोलणार, छगन भुजबळ, लक्ष्मण हाकेंसह ओबीसी नेत्यांवर आजही निशाणा साधणार का? विधानसभेवरुन काय घोषणा करणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Негізгі бет Manoj Jarange LIVE: नारायणगडच्या दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीआधी मराठा समाजाला संदेश
Пікірлер: 12